संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

गेल्या वर्षी शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाले. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यांनतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट शिवसेनेमध्ये पडले. आणि त्यानंतर सशिवसेनेमधील काही आमदार हे एकनाथ शिंदेसोबत जोडले गेले. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फुट पडली. त्यानंतर शिवसेना ( ठाकरे गट ) आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये सातत्याने शाब्दीक चकमक होत असते. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आमदार संजय शिरसाट यांच्यावर विनयभंगाची तक्रार दाखल केली होती.

सुषमा अंधारे यांनी 3 आक्षेप घेतले होते. विनयभंग, बदनामी आणि अब्रू नुकसानीचा दावा त्यांनी केला होता. तर या प्रकरणात पोलिसांनी तपास केला. त्यानंतर पोलिसांनी सांगितलं की अंधारे यांनी वेगवेगळ्या प्रकरणात तक्रार दाखल केले होते. विनयभंग प्रकरणात संजय शिरसाट यांना क्लीनचिट देण्यात आली आहे. या संबधीचे पत्र सुषमा अंधारे यांना चार दिवसांपूर्वी पत्र पाठवण्यात आले आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विनयभंग प्रकरणी शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांना क्लीनचिट मिळाली आहे. पोलिसांनी संजय शिरसाट यांना क्लीनचिट देण्याचा निर्णय घेतला आहे. संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यावेळी अंधारे तिथे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे समोर व्यक्ति नसल्यामुळे विनयभंग होत नाही असा निष्कर्ष देण्यात आला आहे. यामुळे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिलेल्या विनयभांगाच्या प्रकरणात संजय शिरसाट यांना पोलिसांकडून क्लीनचिट देण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंबद्दल एक विधान केलं होतं. त्याविरोधात सुषमा अंधारेंनी परळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, प्रकरण संभाजीनगर येथे घडल्याने परळी पोलिसांनी ते वर्ग केलं होतं. पोलीस तपासानंतर आता संजय शिरसाट यांना क्लीनचिट मिळाली असल्याचं सांगितलं जात आहे. यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते. “काही लोकांना प्रसिद्धीची हाव आहे. कोणत्याही प्रकारे त्यांना प्रसिद्धी हवी आहे. अश्लील बोललं असेल, तर राजकारण सोडून देतो, असं आव्हान दिलं होतं. पण, लावलेले आरोप सहन करणार नाही. आज पोलिसांनी क्लीनचिट दिली आहे,” असं संजय शिरसाटांनी सांगितलं.

हे ही वाचा:

देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंनंतर घेतली एकनाथ शिंदेची भेट

महापुरुषांवर गरळ ओकनाऱ्यांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे, अजित पवार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version