Monday, May 20, 2024

Latest Posts

गृहखात्याचा वचक,दरारा नाही काय?, सुप्रिया सुळे

आज दिवसभरात सर्वात मोठी खळबळजनक घटना ही घडली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे.

आज दिवसभरात सर्वात मोठी खळबळजनक घटना ही घडली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. लॉरेन्स बिश्नोई या गँगस्टरच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. दिल्लीत आल्यावर AK 47 ने उडवून देणार असल्याचं धमकी देणाऱ्याने म्हटलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतलं आहे. या धमकीनंतर संजय राऊत यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी होत आहे. तर या सर्व प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट केले आहे. गृहखात्याचा वचक,दरारा नाही काय? असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे.

लोकप्रतिनिधींना वारंवार अशा धमक्या येईपर्यंत गुन्हेगार निर्ढावले आहेत,याचा अर्थ गृहखात्याचा वचक,दरारा नाही काय ? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. संसदेचे खासदार आणि महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते संजय राऊत यांना एका व्यक्तीने फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. देशातील एका लोकप्रतिनिधीला जर अशाप्रकारे धमकी दिली जात असेल तर ही अतिशय गंभीर बाब असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. केंद्र तसेच महाराष्ट्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन त्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरविण्याची गरज आहे असे सांगतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी अशी विनंतीही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

नेमके प्रकरण काय आहे ? –

संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्लीत आल्यावर AK47 ने उडवून टाकू असा धमकीचा मेसेज राऊतांना आला आहे. लॅारेन्स बिश्नोई गॅगकडून धमकी मिळाली आहे. संजय राऊत धमकी प्रकरणी पुण्यातून (Pune) दोन जणांना ताब्यात घेतले आहे. काल राऊत यांच्या मोबाईलवर धमकीचे मेसेज आले होते. संजय राऊत यांना धमकी दिल्याप्रकरणी पुण्यातून राहुल तळेकर ( वय साधारण 23) या तरुणाला पुण्यातील गुन्हे शाखेने काल रात्री उशिरा अटक केली आहे. ही अटक पुण्यातील खराडी भागातून करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आणि पुणे पोलिस यांच्या गुन्हे शाखेनं संयुक्त कारवाई केली आहे. राहुल तळेकरला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

हे ही वाचा : 

लॅारेन्स बिश्नोई गॅगकडून संजय राऊतांना दिलेल्या धमकीवर, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

संजय राऊतांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी; मोबाईलवर आला मेसेज!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss