Monday, May 20, 2024

Latest Posts

लॅारेन्स बिश्नोई गॅगकडून संजय राऊतांना दिलेल्या धमकीवर, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना धमकी देणारा माणूस सापडला आहे. मिळालेल्या माहिती नुसार नसेल त्या व्यक्तीने संजय राऊत यांना धमकी दिली आहे असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना धमकी देणारा माणूस सापडला आहे. मिळालेल्या माहिती नुसार नसेल त्या व्यक्तीने संजय राऊत यांना धमकी दिली आहे असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. परंतु हे प्राथमिक रिपोर्ट आहेत. त्यामुळे यासंदर्भात संपूर्ण तपास केला जाणार आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. आणि त्या व्यक्तीवर कारवाई केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री आज नागपूरमध्ये बोलत होते. महाराष्ट्रामध्ये कोणीही कोणाला धमकी देत असेल तर सरकार शांत बसणार नाही. त्या व्यक्तींवर कारवाई होईल असे फडणवीस म्हणाले.

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आलेल्या धमक्यासंदर्भात चेष्ठा करण्याचे कोणतेही कारण नसल्याचेही ते म्हणाले. विरोधकांना येत असलेल्या धमक्या सरकार गांभीर्याने घेत नसल्याचे आरोप संजय राऊत यांनी केला होता. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आम्हाला आलेल्या धमक्यांची चेष्ठा करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांना अडचण झाली आहे. त्या लोकांना मी गृहमंत्री नाही राहिलो तर बरं होईल असे त्यांना वाटत आहे. पण त्यांना मी सांगू इच्छितो की, गृहमंत्री मी राहणार आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री पदाचा चार्ज दिला आहे. त्यामुळे जे जे चुकीचं काम करतील त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मागच्या काळात मी पाच वर्ष गृहमंत्री म्हणून कारभार सांभाळला आहे. मी जे कायदेशीर आहे तेच करतो. मी कोणाला घाबरत नाही कायद्यानेच वागतो हे राज्य कायद्यानेच चालेल असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

संजय राऊत याना जीवे मारण्यासाठी धमकी देण्यात आली आहे. दिल्लीमध्ये आल्यावर AK47 ने उडवून टाकू असा धमकीचा मेसेज संजय राऊत यांना आला आहे. लॅारेन्स बिश्नोई गॅगकडून धमकी मिळाली आहे आणि संजय राऊत धमकी प्रकरणामध्ये पुण्यातून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. काळ संजय राऊत यांच्या मोबाईलवर धमकीचे मेसेज आले होते. राऊत यांना धमकी दिल्याप्रकरणी पुण्यातून राहुल तळेकर या तरुणाला पुण्यातील गुन्हे शाखेने काळ रात्री नाकात केली आहे. ही अटक पुण्यातील खराडी भागातून करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आणि पुणे पोलीस यांच्या गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई केली आहे. राहुल तळेकरला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अशी माहिती सूत्रांच्या माध्यमांतून मिळाली आहे.

महाराष्ट्रामधील सगळी सुरक्षा व्यवस्था ही गद्दार गटाचे आमदार, खासदार त्यांचे पदाधिकारी यांच्या सुरक्षेसाठी लावण्यात आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या दंगली महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणारे अत्याचार असा घटना घडत असतात. परंतु राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या घटनेकडे लक्ष देत नाहीत. आम्ही जेव्हा अशा प्रकारच्या धमक्यांची माहिती देत असतो. तेव्हा गृहमंत्री चेष्ठा करतात. आमचा स्टंट असल्याचं ते सांगतात. मला ठाण्यामधून आलेल्या धमकीत मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांचे नाव आहे. ही गोष्ट तुम्ही गांभीर्याने घेत नाहीत काळ रात्री सुद्धा मला अनेक धमकी आली आहे असे संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा : 

संजय राऊतांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी; मोबाईलवर आला मेसेज!

पोलिसांवर दबाव आणला जातोय, त्यांना चुकीच्या कारवाया करण्यास भाग पाडले जात आहे – नाना पटोले

नवीन आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये 1st April पासून नवीन नियम लागू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss