Tuesday, May 21, 2024

Latest Posts

लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्यांसोबत… PM Modi यांच्या ऑफरवर Sharad Pawar यांचे प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या प्रचारसभेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मोठी ऑफर देत, 'काँग्रेससोबत जाण्यापेक्षा आमच्यासोबत या,' असे वक्तव्य केले आहे. आता शरद पवार यांनी यावर प्रत्युत्तर दिले असून 'लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्यांसोबत जाणार नाही,' असे म्हंटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (शुक्रवार, १० मे) नंदुरबार येथे महायुतीच्या (Mahayuti) प्रचारसभेत शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठी ऑफर देत, ‘काँग्रेससोबत जाण्यापेक्षा आमच्यासोबत या,’ असे वक्तव्य केले आहे. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून राजकीय चर्चांना उधाण आले. त्यातच, आता शरद पवार यांनी यावर प्रत्युत्तर दिले असून ‘लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्यांसोबत जाणार नाही,’ असे म्हंटले आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे राजकीय वातावरणात चर्चा रंगू लागल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, गेल्या ४० ते ५० वर्षांपासून महाराष्ट्राचे एक दिग्गज नेते राजकारणात सक्रिय आहेत. ते सध्या काहीही बोलत आहेत. बारामतीच्या निवडणुकीनंतर ते चिंतेत असून त्यांनी अनेक लोकांसोबत चर्चा करून हे वक्तव्य केले असावे असे मला वाटत. चार जून नांतर सार्वजनिक आणि राजकीय जीवनात टिकून राहायचं असेल तर छोट्या छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल, असं त्यांना वाटत आहे. याचाच अर्थ नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेणार आहेत. म्हणौनीच त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा शरद पवार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत यावे आणि उद्धव ठाकरे यांनी शिंदेंसोबत यावे.”

यावर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. शरद पवार म्हणाले, “नरेंद्र मोदींमुळे लोकशाही धोक्यात आहे. मोदींनी सोरेन आणि केजरीवाल यांना तुरुंगात टाकलाय. गांधी नेहरूंची विचारधारा आम्हाला मान्य आहे. हा देश एकसंघ ठेवायचा आहे. त्यासाठी सर्वच धर्मांना सोबत घेऊन पुढे जावे लागणार आहे.”

“पंतप्रधानांनी एका धर्माविषयी वेगळी भूमिका घेतल्याचं दिसून आलं. एका समाजाविरुद्ध वेगळी भमिका मांडल्यास ऐक्य राहणार नाही. लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्यांसोबत जाणार नाही. हि मोदींची अस्वस्थता आहे. त्यातूनच ते अशी विधाने करत आहेत. मोदींना जरी आमची गरज पडत असेल तरी आम्ही आमच्या बुद्धीला जे पटते त्या आमच्या विचारांना सोडून कुठेही जाणार नाही, असे ते पुढे म्हणाले.

हे ही वाचा:

Congress मध्ये जाण्यापेक्षा आमच्यासोबत या, PM Modi यांची Sharad Pawar, Uddhav Thackeray यांना मोठी ऑफर

Sharad Pawar यांनी हार मानली का? Eknath Shinde यांचे वक्तव्य चर्चेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss