Saturday, July 27, 2024

Latest Posts

बारामतीत सुप्रिया सुळे – सुनेत्रा पवार आमने सामने? शरद पवार म्हणाले…

बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढणार असल्याची चर्चा रंगली आहे. तशा हालचालीही सुरु आहेत.

Sharad Pawar on Baramati Loksabha Constituency : सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला मिळाले आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणूक तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे आता शरद पवार यांना या निवडणूक नवीन चिन्ह आणि नवीन नावावर लढाव्या लागणार आहेत. परंतु सध्या संपूर्ण देशाचे लक्ष हे शरद पवारांच्या बारामतीकडे लागले आहे. राष्ट्रवादी मध्ये फूट पडल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे बारामतीसाठी नेमके कोण उमेदवार असणार अश्या अनेक चर्चाना सध्या चांगलंच उधाण हे आलं आहे. तसेच बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढणार असल्याची चर्चा रंगली आहे. तशा हालचालीही सुरु आहेत. अशातच या सगळ्यावर कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

यावेळी माध्यमांशी बोलत असताना शरद पवार म्हणाले आहेत की, सत्तेचा गैरवापर कसा करतात, हे चंडीगडमध्ये पाहायला मिळालं. यावरून सत्तेचा वापर कसा करतात हे दिसलं. पक्षाची स्थापना मी केली. आमच्याकडून पक्ष काढून दुसऱ्यांना दिलं. आमचं चिन्ह काढून दुसऱ्यांना देण्यात आलं. पण आमचा अजून न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पक्षांत्तर बंदी कायद्याबाबत सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे, असं पवार म्हणाले.

तसेच शरद पवार पुढे म्हणाले आहेत की, काही दिवसांआधी अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावर शरद पवारांनी भाष्य केलं. आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव अटळ असल्याचं शरद पवार म्हणाले. आमदार सोडून जाणं हे मला चिंता करण्यासारखी गोष्ट वाटत नाही. ए आर अंतुले मुख्यमंत्री असतानाही असंच झालं होतं. मी परदेशात असताना ५९ पैकी ५ सोडून सर्व आमदार सोडून गेले होते. पण नंतरच्या निवडणुकीत 95 टक्के आमदार पराभूत झाले. या इतिहासाची पुनरावृत्ती होणार हे नक्की, असं शरद पवार म्हणाले.

हे ही वाचा:

मराठा समाजाचे आरक्षण १६ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणले, देवेंद्र फडणवीसांनी सांगितली आकडेवारी

मराठा आरक्षण जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिले धन्यवाद

पुण्यात दीड दिवसांत ६०० किलो ड्रग्स जप्त, कुरकुंभमध्ये ड्रग्सचा अड्डा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss