Friday, May 17, 2024

Latest Posts

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सुरू केलेल्या 'मन की बात' या कार्यक्रमाची शंभरी पूर्ण होणार आहे. यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर असणार आहेत आणि ते मुंबईमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमाला अमित शाह उपस्थित राहणार आहेत.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सुरू केलेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाची शंभरी पूर्ण होणार आहे. यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर असणार आहेत आणि ते मुंबईमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमाला अमित शाह उपस्थित राहणार आहेत. विलेपार्लेमध्ये ‘मन की बात’ हा कार्यक्रम लाईव्ह प्रसारित केला जाणार आहे आणि याच कार्यक्रमाला अमित शाह हजेरी लावणार आहेत. मुंबईत त्यानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहेत. भाजपचे अनेक बडे नेते ठिकठिकाणी या कार्यक्रमांना कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर असणार आहेत आणि विलेपार्ले मधील म.ल.डहाणूकर महाविद्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शंभराव्या मन की बात कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हजेरी लावणार आहेत. तर पियुष गोयल कांदिवलीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. भाजप पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात या रेडिओ प्रसारणाचा शंभरावा भाग ‘अभूतपूर्व’ जनसंपर्क कार्यक्रम बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न भाजपचे सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी त्यांच्या मासिक प्रसारणादरम्यान अनेक मुद्द्यांवर बोलतात. हा कार्यक्रम २०१४ मध्ये करण्यात आला होता.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासून सातत्याने मन की बात या कार्यक्रमाद्वारे दर महिन्याच्या अंतिम रविवारी जनतेशी संवाद साधतात. आज मन की बात शंभरीत पदार्पण करणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे. देशवासीयांशी थेट संवाद साधता यावा त्यांच्या कल्पना समस्या आणि मते ऐकण्यासाठी या उद्देशाने मोदींनी यान कार्यक्रमाची सुरुवात केली होती. आज या मन की बातची शंभरी पूर्ण होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून देशभरामध्ये या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी सुरु आहे. मुंबईसह उपनगरातल्या ५ हजारांहून अधिक ठिकाणी ‘मन की बात’ कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

“राज ठाकरे यांनी जसे त्यांच्या काकांवर लक्ष ठेवले तसे मी माझ्या काकांवर लक्ष ठेवेल”, अजित पवारांचे प्रत्युत्तर

वरळीच्या पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात विद्यार्थ्याचा मृत्यू

मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याचा विचारात असाल तर एकदा रेल्वेचे वेळापत्रक नक्की पहा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss