CSKvsDC, दिल्लीच्या पदरात पुन्हा एकदा पराभव

काल पार पडलेल्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या संघामध्ये चेन्नईच्या संघाने दणदणीत विजय मिळवला आहे. चेन्नई सुपर किंग्सने १६८ धावांचे आवाहन दिल्ली कॅपिटल दिले होते.

CSKvsDC, दिल्लीच्या पदरात पुन्हा एकदा पराभव

काल पार पडलेल्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या संघामध्ये चेन्नईच्या संघाने दणदणीत विजय मिळवला आहे. चेन्नई सुपर किंग्सने १६८ धावांचे आवाहन दिल्ली कॅपिटल दिले होते. चेन्नईच्या संघाने २० षटकात आठ विकेट्स घेऊन १४० धावांपर्यंतच मजल मारता आली. चेन्नई सुपर किंग्सने सामना २७ धावांनी जिंकला. दिल्लीच्या कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचे ठरवले. फलंदाजीमध्ये चेन्नई सुपर किंग्सने सुरुवातीला फार काही चांगली कामगिरी केली नाही. सध्या गुणतालिकेमध्ये चांगलीच लढत सुरू आहे. कालचा सामना जिंकल्यानंतर गुणतालिकेमध्ये काहीही बदल झालेला नाही.

कालचा विजयासह चेन्नई सुपर किंग्सचे १५ गुण झाले आहेत परंतु त्यांचे स्थान अजूनही दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दिल्ली कॅपिटलचा संघ हा शेवटच्या स्थानावर वरच आहे. चेन्नई सुपर किंग्सकडून माथेशा पाथीराणाने तीन विकेट्स घेतले तर दीपक चाहर याने दोन विकेट्स घेतले. दिल्लीच्या संघाकडून सर्वाधिक ३५ धावा रिले रुसोने केल्या. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला दीपक चाहर याने पहिल्याच चेंडूत बाद केले. यानंतर आक्रमक फलंदाजी करणारा फिल्प सॉल्टने २ षटकार आणि एक चौकार ठोकला. मात्र दीपकने त्याची ही खेळी १७ धावांवर संपवली.

चेन्नईकडून शिवम दुबेने सर्वाधिक २५ धावा केल्या. धोनीने २२२.२२ च्या स्ट्राईक रेटने ९ चेंडूत २० धावा चोपल्या. तर जडेजाने १६ चेंडूत २१ धावा करून त्याला चांगली साथ दिली. चेन्नई सुपर किंग्स संघ १५० हुन जास्त धावसंख्या करेल अशी अपेक्षा नव्हती परंतु चेन्नईचा कर्णधार एम एस धोनी आणि रवींद्र जडेजाने शेवटच्या काही षटकांमध्ये चांगलेच गोलंदाजांना धुतले. या दोघांनी शेवटच्या काय षटकांमध्ये ३९ धावा केल्या. यावर्षीच्या सीझनमध्ये धोनी शेवटच्या काही षटकांमध्ये फलंदाजी करण्यासाठी येत आहे असे दिसून आले.

हे ही वाचा : 

सर्वात मोठी बातमी !, सत्तासंघर्षांचा निकाल काही तासांवर असताना Narhari Zirwal ‘नॉट रिचेबल’

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष Jayant Patil यांना ईडीची नोटीस

Maharashtra Political Crisis, आज ‘महाराष्ट्राचा सर्वोच्च निकाल’, १६ आमदारांच्या अपात्रतेचा होणार फैसला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version