Wednesday, April 24, 2024

Latest Posts

GTvsLSG, आजच्या सामन्यात पांड्या बदर्स आमनेसामने, कोण ठरणार वरचढ?

आज आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये दोन सामने पाहायला मिळणार आहेत. यामध्ये दुपारचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (Gujarat Titans vs Lucknow Super Giants) या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे.

आज आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये दोन सामने पाहायला मिळणार आहेत. यामध्ये दुपारचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (Gujarat Titans vs Lucknow Super Giants) या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. आज पांड्या ब्रदर्स एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळणार आहेत. गुजरात टायटन्सचा संघ आतापर्यत १० सामान्यांकडे सात विजय मिळवून पहिल्या क्रमांकावर आहे. आजचा त्यांचा सामना लखनौ सुपर जायंट्स सोबत होणार आहे. आजच्या सामन्यामध्ये केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे बाहेर पडला असला तरी सुपर जायंट्सकडे कोणत्याही प्रतिस्पर्ध्याविरुद्ध स्वत:ची पकड ठेवण्याची क्षमता चांगली आहे.

दोन्ही संघ विजयी झाल्यानंतर पुन्हा एकदा महत्वाच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असतील. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यामधील आजचा सामना रविवारी दुपारी ३.३० वाजता होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. या मैदानात सामन्यामध्ये जवळपास ७५ टक्के विकेट घेतल्याने वेगवान गोलंदाजांना पुरेशी मदत मिळाली आहे. मागील सामन्यामध्ये दोन्ही डावात आठ विकेट पडल्यामुळे पॉवरप्लेचा टप्पा गोलंदाजासाठी महत्वाचा ठरेल. नाणेफेक जिंकल्यावर पाठलाग करणे हा प्राधान्याचा पर्याय आहे.

गुजरात टायटन्स संघाची प्लेइंग ११ शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (wk), विजय शंकर, हार्दिक पांड्या (c), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, नूर अहमद, मोहित शर्मा आणि मोहम्मद शमी

लखनौ सुपर जायंट्स संघाची प्लेइंग ११ काइल मेयर्स, मनन वोहरा, करण शर्मा, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या (क), निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, रवी बिश्नोई, नवीन उल हक, मोहसिन खान आणि कृष्णप्पा गौथम

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss