Friday, May 3, 2024

Latest Posts

IND vs AUS Schedule 2023 न्यूझीलंडनंतर आता ऑस्ट्रेलियाची पाळी, ४ कसोटी मालिकेनंतर खेळली जाणार ३ वनडे मालिका, पहा संपूर्ण वेळापत्रक

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या दौऱ्यातील पहिला सामना दोन्ही संघांमध्ये ९ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे.

श्रीलंका आणि न्यूझीलंडनंतर आता ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ भारत दौरा करणार आहे. भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन संघ ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून त्यानंतर ३ सामन्यांची वनडे मालिकाही खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या दौऱ्यातील पहिला सामना दोन्ही संघांमध्ये ९ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने बुधवारी तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा १६८ धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ ने विजय मिळवला. मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला न्यूझीलंडकडून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना ९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान नागपुरात खेळवला जाणार आहे. दुसरा कसोटी सामना १७ ते २१ फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत, तिसरा कसोटी सामना १ मार्च ते ५ मार्च दरम्यान धर्मशाला येथे आणि चौथा कसोटी सामना ९ मार्च ते १३ मार्च दरम्यान अहमदाबादमध्ये खेळवला जाईल.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी वेळापत्रक (बॉर्डर गावस्कर ट्रॉफी वेळापत्रक)

  • पहिली कसोटी, ९-१३ फेब्रुवारी – विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर
  • दुसरी कसोटी – १७-२१ फेब्रुवारी – अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
  • तिसरी कसोटी – १-५ मार्च – हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाला
  • चौथी कसोटी – ९-१३ मार्च – नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

१७ मार्चपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात कसोटी मालिकेव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया संघ ३ सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे. २०२३ हे वर्ष विश्वचषकाचे वर्ष आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका टीम इंडियासाठी त्यांच्या उणीवा दूर करून स्वत:साठी परिपूर्ण प्लेइंग इलेव्हन शोधण्याची उत्तम संधी असेल. वनडे मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, यावर्षी टीम इंडियाने श्रीलंका आणि न्यूझीलंडला पराभूत करून शानदार सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धही ही कामगिरी कायम ठेवण्याचा संघाचा प्रयत्न असेल.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे वेळापत्रक

  • पहिला एकदिवसीय – १७ मार्च – वानखेडे स्टेडियम, मुंबई
  • दुसरी वनडे – १९ मार्च – विशाखापट्टणम
  • तिसरी एकदिवसीय – २२ मार्च – एमए चिदंबरम स्टेडियम, पुणे

सर्व कसोटी सामने भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० वाजता सुरू होतील, तर एकदिवसीय सामने दुपारी २ वाजता सुरू होतील.

भारत आणि ऑस्ट्रेलियाचे कसोटी संघ:

टीम इंडिया:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), रविचंद्रन अश्विन, श्रीकर भरत, इशान किशन, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, जयदेव उनाडकट, सूर्य कुमार यादव आणि उमेश यादव.

टीम ऑस्ट्रेलिया:

पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅट रेनशॉ, मिचेल स्टार्क आणि डेव्हिड वॉर्नर.

हे ही वाचा:

बालेकिल्ल्यातच भाजपला मोठा धक्का, महाविकास आघाडीचा दणदणीत विजय

नाशिकमध्ये मतमोजणी दरम्यान गोंधळ, कायदा सुवेस्थेचा प्रश्न बिघडणार ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss