Saturday, May 4, 2024

Latest Posts

IND vs SA 1st ODI: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, पहिल्या वनडे सामन्यावर पावसाचे संकट

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच ६ ऑक्टोबर खेळवला जाणार आहे. लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेय एकना क्रिकेट स्टेडिअमवर हा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. मात्र पावसामुळे हा सामना सुरु होण्यास उशीर होणार आहे, अशी शक्यता आता निर्माण झालीय.

वनडे सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. मात्र पावसामुळे खेळाडूंची आणि फॅन्सची निराशा होण्याची शक्यता आहे. कारण लखनऊमध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे दिवसभर पावसाची शक्यता असणार आहे. त्यामुळे आता बीसीसीआयने मॅचचं नवीन टाईमिंग सांगितलं आहे.

बीसीसीआयने (BCCI) सामन्याला उशीर झाल्याची माहिती दिली आहे. बीसीसीआयने ट्विटरवर पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘पावसामुळे सामना सुरु व्हायला उशीर होणार आहे. सामन्यापूर्वी मैदानाची पाहणी करण्यात आली. मॅच आणि टॉसची वेळ आता अर्ध्या तासाने वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता नाणेफेक दुपारी १.३० वाजता होणार आहे, तर सामना दुपारी २ वाजता सुरू होईल.

झिम्बाब्वेनंतर ‘गब्बर’समोर नवं आव्हान

झिम्बाब्वे दौऱ्यानंतर पुन्हा एकदा बीसीसीआयनं वन डे संघाची धुरा शिखर धवनकडे सोपवण्यात आली आहे. झिम्बाब्वे दौऱ्यातल्या वन डे मालिकेतही धवनच्या नेतृत्वात टीम इंडियानं वन डे मालिका जिंकली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही भारतीय संघ धवनच्या नेतृत्वात चांगली कामगिरी बजावेल अशी अपेक्षा आहे.

 भारताचा वन डे संघ :  धवन, श्रेयस अय्यर, ऋतुराज, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, सिराज, दीपक चहर

Latest Posts

Don't Miss