MI vs LSG, आजच्या सामन्यात रोहित शर्मा आणि कृणाल पांड्या आमनेसामने

आयपीएल २०२३ मध्ये आजचा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये रंगणार आहे. हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत.

MI vs LSG, आजच्या सामन्यात रोहित शर्मा आणि कृणाल पांड्या आमनेसामने

आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये आजचा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Lucknow Super Giants vs Mumbai Indians) या दोन संघांमध्ये रंगणार आहे. हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत. मुंबई इंडियन्सचा संघ १४ गुणांसह गुणतालिकेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे तर १३ गुणांसह लखनौ सुपर जायंट्सचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्हीही संघांसाठी महत्वाचा ठरणार आहे. आजच्या पराभूत होणाऱ्या संघाच्या अडचणीत वाढ होणार आहे तर विजयी संघ प्लेऑफच्या दिशेने जाईल. आजचा सामना हा लखनौच्या एकाना स्टेडियमवर होणार आहे. आजचा सामन्यांमध्ये कोणता संघ विजयी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने आजचा सामना गमावल्यास हा संघ प्लेऑफ च्या शर्यतीतून बाहेर देखील होऊ शकतो. कारण लखनौ सुपर जायंटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सचा सामना रद्द झाल्यामुळे त्यांना गुण देण्यात आला होता. आता त्यांचे १५ गुण असून मुंबई इंडियन्सचे १६ गुण आहेत. मुंबई इंडियन्सने आपल्या मागील सामन्यामध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्सला पराभवाची धूळ चारली होती. या सीझनमध्ये सीझनमध्ये दोन्हीही संघानी प्रत्येकी १२-१२ सामने खेळले आहेत. रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स ला ७ तर लखनौ सुपर जायंटन्स या दोन्ही संघाला सहा सामने जिंकण्यास यश मिळले आहे. हे दोन्ही संघ केवळ दोन वेळा आमनेसामने आले आहेत.

मुंबई इंडियन्स ची संभाव्य प्लेइंग ११ – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, नेहाल वढेरा, विष्णू विनोद, टिम डेव्हिड, कॅमरून ग्रीन, ट्रिस्टन स्टब्स, ख्रिस जॉर्डन, पियुष चावला, जेसन बेहरेनडोर्फ

लखनौ सुपर जायंटन्स संघाची संभाव्य प्लेइंग ११ – क्विंटन डिकॉक, कायल मेयर्स, कृणाल पांड्या, प्रेरक मांकड, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, युद्धवीर सिंग चरक

हे ही वाचा : 

शेवगाव, सातारा येथील हिंसाचाराच्या घटनेमुळे पोलिसांना केले अलर्ट

देवेंद्र फडणवीसांकडून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पालिका निवडणूका होतील याबाबतचे संकेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version