Friday, April 26, 2024

Latest Posts

देवेंद्र फडणवीसांकडून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पालिका निवडणूका होतील याबाबतचे संकेत

मुंबई, पुण्यासह अनेक बड्या शहरातील महानगर पालिका निवडणूका अजून देखील झाल्या नाही . सत्तांतरानंतर शिंदे फडणवीस सरकार येऊन जवळपास १० महिने झाले तरी निवडणुकांचा प्रश्न काही मार्गी लागताना दिसत नाहीय.

मुंबई, पुण्यासह अनेक बड्या शहरातील महानगर पालिका निवडणूका अजून देखील झाल्या नाही . सत्तांतरानंतर शिंदे फडणवीस सरकार येऊन जवळपास १० महिने झाले तरी निवडणुकांचा प्रश्न काही मार्गी लागताना दिसत नाहीय. नक्की निवडणूक कधी घेतल्या जाणार आहे याबाबाबत अजून देखील कोणताही खुलासा केला गेला नव्हता. कोरोना महामारीत मुदत संपलेल्या शहरांतील महापालिका निवडणुका वर्षभरापेक्षा अधिक कालावधीपासून प्रलंबित आहेत. काही कायदेशीर बाबींमुळे या निवडणुका अद्याप होऊ शकलेल्या नाहीत. गेल्या दीड वर्षांपासून महापालिका निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आले आहेत असे असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता या निवडणुकांबाबत महत्वाचे विधान केले आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात महापालिका निवडणुका होऊ शकतात, असं मोठे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. महापालिकेच्या निवडणुकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जुलै महिन्यामध्ये सुनावणी होऊन ऑगस्टमध्ये निकाल येऊन साधारण ऑक्टोबरमध्ये निवडणूक होतील असा अंदाज देवदेन्द्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे. लोकसभेच्या निवडणुका या लोकसभेच्या वेळीच होतील विधानसभेच्या निवडणुका विधानसभेच्या होतील. लोकसभेच्या निवडणुका मोदींचे नेतृत्वाखाली आम्ही प्रचंड मतांनी निवडून येऊ त्यानंतर अधिकच काम करून आम्ही विधानसभेमध्ये निवडणुका जिंकू, असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.

त्याचबरोबर राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पहिल्या लढाईत भाजप-शिवसेनेचा भगवा झेंडा पुणे महापालिकेवर फडकेल, असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातून संवाद साधला. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास महापालिका निवडणूक होण्याचे संकेतही दिले. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार मेधा कुलकर्णी, दिलीप कांबळे, राजेश पांडे आदी या वेळी उपस्थित होते.

हे ही वाचा : 

कर्नाटक मुख्यमंत्रीपदाचा कारभार कोण सांभाळणार सिद्धरामय्या की शिवकुमार?

Governor Ramesh Bai यांनी दिला ईशारा, परीक्षांचा निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्यास…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss