Saturday, May 18, 2024

Latest Posts

भारताच्या भूमीवर रंगणार ODI World Cup 2023

भारताच्या मैदानावर वनडे वर्ल्ड कप २०२३ ची स्पर्धा रंगणार आहे. वनडे वर्ल्ड कप २०२३ ची स्पर्धा पाहण्यासाठी जगामधील क्रिकेटप्रेमी उत्सुक झाले आहेत.

भारताच्या मैदानावर वनडे वर्ल्ड कप २०२३ ची स्पर्धा रंगणार आहे. वनडे वर्ल्ड कप २०२३ ची स्पर्धा पाहण्यासाठी जगामधील क्रिकेटप्रेमी उत्सुक झाले आहेत. १९ नोव्हेंबरला वनडे वर्ल्ड कप २०२३ ची फायनल होणार आहे. भारताच्या संघाला यावर्षीचा वर्ल्ड कप विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. परंतु २ अशा टीम ज्या भारताचे वनडे वर्ल्ड कप विजयाच स्वप्न मोडू शकतात. मागील १० वर्षांपासून भारताच्या संघाला आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. भारतामध्ये होणारी वनडे वर्ल्ड कप स्पर्धा एक चांगली स्पर्धा आहे. भारताच्या संघाला मायदेशामध्ये वर्ल्ड कप खेळण्याचा नक्की फायदा होणार आहे. कारण इथल्या खेळपट्ट्या आणि हवामानाचा इतर संघांपेक्षा भारताच्या संघाला जास्त फायदा होणार आहे.

वनडे वर्ल्ड कप २०२३ मध्ये फक्त दोन संघ भारताचे वनडे वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न भंग करू शकतो. वनडे वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या त्या दोन धोकादायक टीम आहेत. ऑस्ट्रेलियाच्या संघाने आतापर्यत ५ वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. इंग्लंड २०२३ मधील वर्ल्ड कप विजेता मैदानामध्ये उतरणार आहे. मागील वर्ल्ड कपमध्ये भारताच्या संघाचा न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये पराभव केला होता. त्यामुळे भारताच्या संघाला वनडे वर्ल्ड कप २०२३ मध्ये या दोन संघांकडून धोका आहे.

ऑस्ट्रेलियाच्या संघाने १९८७, १९९९, २००३, २००७ आणि २०१५ असं पाचवेळा वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे. वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियापासून भारताला धोका असेल. ऑस्ट्रेलियाच्या बऱ्याच खेळाडूंना भारतात क्रिकेट खेळण्याचा मोठा अनुभव आहे. ऑस्ट्रेलियाकडे डेविड वॉर्नर, मॅथ्यू वेड, स्टीव स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्ससारखे घातक खेळाडू आहेत. त्याचबरोबरभारताच्या संघाला वर्ल्ड कप २०२३ मध्ये इंग्लंडपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. गोलंदाजीत इंग्लंडकडे मार्क वुड, क्रिस वोक्स, सॅम कुरेन, बेन स्टोक्स, मोईन अली आणि आदिल राशिदसारखे घातक क्रिकेटर्स आहेत.

हे ही वाचा:

अनुराग ठाकुर यांच्या भेटीदरम्यान कुस्तीपटूंनी केलेल्या मागणीच काय?

International Yoga Day निम्मित भाजपचा मेगा प्लॅन, पंतप्रधानसह अनेक नेते होणार सहभागी

‘Kon Honar crorepati’ मध्ये विशेष भागात दिसणार तीन यार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss