Wednesday, May 15, 2024

Latest Posts

रुतुराजच्या वाढदिवशी चर्चा होतेय सायली संजीवच्या पोस्टची, अफेअरच्या चर्चांवर अभिनेत्रीने केले भाष्य

IPL नंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये ठसा उमटवून नुकताच टीम इंडियात सामील झालेल्या रुतुराज गायकवाडसाठी आजचा दिवस खूप खास आहे. आज ३१ जानेवारीला ऋतुराजचा आज ३१ जानेवारीला ऋतुराजचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म पुणे, महाराष्ट्र येथे झाला. ऋतुराज गायकवाडचा आज २६वा वाढदिवस आहे.सोशल मीडियावर त्याचे चाहते त्याला वाढदिवसाच्या देत आहेत. पण, अशातच आता ऋतुराजसोबत अफेयर असल्याच्या अफवा असणारी मराठी अभिनेत्री सायली संजीव हिचीही सोशल मीडियावरील एक पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये सायलीसमोर केक असल्याचे दिसून येत आहे. तर ती त्या केकेकडे पाहून काहीतरी विश मागताना देखील दिसत आहे.

 ऋतुराज आणि सायली यांच्या अफेयरवरील चर्चांवर भाष्य केले आहे. सायली संजीवने एका मुलाखतीत यावर स्पष्ट मतदेखील मांडले होते. या अफवांमुळे आमच्या मैत्रीच्या नात्यातही दुरावा आल्याचे ती म्हणाली होती. पण मुख्य म्हणजे महाराष्ट्राच्या या लाडक्या अभिनेत्रीचा देखी; ३१ जानेवारी रोजी वाढदिवस आहे. त्यामुळे तिने तिच्या इंस्टाग्रामवर हा फोटो पोस्ट केला आहे. परंतु तिच्या या पोस्टमध्ये कोणताही उल्लेख नसल्याने ऋतुराजला वाढदिवसाला सायलीने सेलिब्रेशन केले, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. सायली म्हणाली, आमच्या नात्याबद्दल जेव्हा चर्चा रंगू लागल्या तेव्हा त्याचा परिणाम आमच्या मैत्रीवर झाला. आता मैत्रीच्या नात्यातही दुरावा निर्माण झाला आहे. आता आम्ही मित्रासारखं बोलूही शकत नाही. माझं नाव त्याच्यासोबत जोडलं जातंय याचा अंदाज ही मला नव्हता. आम्ही सुरुवातीला बोलायची पण आमच्यात आता बोलणं होतं नाही.

तुराजला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची खूप आवड होती. त्यांनी वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड येथील दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश घेतला. तो आयपीएल 2021 (रुतुराज गायकवाड IPL) मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. ऋतुराजला ‘इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर’चा पुरस्कारही मिळाला. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळतो.

हे ही वाचा:

आप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण! । Appasaheb Dharmadhikari । Maharashtra Bhushan

मोदी आज तेच करतायत ना, दारूड्याचे उदाहरण देत प्रकाश आंबेडकरांनी केली मोदींवर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss