Degree courses च्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात बारावीचा (HSC) निकाल ९१.२५ % लागला असून विद्यार्थी उत्तम मार्कांनी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी लगभग सुरु होते.

Degree courses च्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात बारावीचा (HSC) निकाल ९१.२५ % लागला असून विद्यार्थी उत्तम मार्कांनी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी लगभग सुरु होते. मागच्या २ वर्षात कोरोनाचे साम्राज्य असल्यामुळे विद्यापीठाच्या निकालाचे त्याचबरोबर प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडून गेले होते. पण यावर्षी निकाल हा वेळेवर लागला असून आजपासूनच प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाअंतर्गत सर्व महाविद्यालयांमधील पदवी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया २७ मे पासून म्हणजेच आजपासूनच सुरुवात झाली आहे. मागील दोन वर्षे कोरोनाच्या प्रभावामुळे कॉलेजेस उशिरा सुरु होत असल्याने सगळे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. मात्र यावर्षी वेळापत्रकाची घडी व्यवस्थित करण्यासाठी विद्यापीठाने प्रवेशाचे वेळापत्रक निकाल लागल्यानंतर त्वरित घोषित केले. चला तर मग प्रवेशप्रक्रियेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

प्रवेशप्रक्रिया अशी असेल!

मुंबई विद्यापीठाअंतर्गत असलेल्या सर्व कॉलेजेमध्ये डिग्री कोर्सेससाठी आजपासून ऑनलाईन (Online) अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. आज, दिनांक २७ मे पासून दुपारी १ वाजता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांना पदवीच्या अभ्यासक्रमासाठी १२ जून पर्यंत अर्ज भरण्याची मुदत ही मुंबई विद्यापीठाकडून दिली गेली आहे. तसेच अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची पहिली प्रवेश यादी ही १९ जून रोजी जाहीर होणार आहे. २० ते २९ या तारखेदरम्यान ऑनलाईन कागतपत्रांची हाताळणी तसेच इतर काही प्रक्रिया होणार आहेत. पाठोपाठ २८ जून ला दुसरी प्रवेश यादी जाहीर होणार असून ३० जुने ते ५ जुलै पर्यंत ऑनलाईन कागदपत्रांची पाहणी तसेच इतर काही प्रक्रिया होणार आहेत. त्यानंतर ६ जुलै रोजी तिसरी प्रवेश यादी जाहीर होऊन ७ ते १० जुलै दरम्यान कागदपत्रांची पाहणी आणि इतर प्रक्रिया होणार आहेत.

ऑनलाईन नोंदणी करताना या गोष्टी लक्षात ठेवा –

विद्यार्थाना ऑनलाईन नोंदणी ही विविध अभ्यासक्रमांसाठी त्याचबरोबर विविध कॉलेजेससाठी करता येणार आहे. विद्यार्थांनी नोंदणी अर्जाची प्रांत कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी जमा करणे आवश्यक आहे. या अर्जासोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी. तसेच ऑनलाईन अर्ज करताना विद्यार्थांनी न विसरता १० वी आणि १२ वीच्या गुणपत्रिका सोबत ठेवाव्या. विद्यार्थांनी ऑनलाईन नोंदणी ही दिलेल्या ठराविक वेळेतच करावी. ऑनलाईन प्रवेश अर्जाची प्रत विद्यार्थ्याकडे नसेल तर त्याला कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश घेता येणार नाही.

हे ही वाचा:

बारावी नंतर हे Diploma Courses मुलींचे करिअर बनवू शकेल उत्तम

HSC उत्तीर्ण? या सरकारी नोकरी ठरतील तुमच्यासाठी उत्तम पर्याय

बारावी नंतर टीव्हीवर झळकण्याची इच्छा? हा कोर्स ठरेल उत्तम पर्याय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version