Sunday, May 19, 2024

Latest Posts

अमूलचे एमडी आरएस सोधी यांचा राजीनामा, जयेन मेहता सांभाळणार पदभार

काही महिन्यांनंतर अमूलला नवीन एमडी मिळेल. गांधीनगर मधुर डेअरीचे अध्यक्ष शंकरसिंह राणा यांनी याला दुजोरा दिला आहे.

अमूल या प्रसिद्ध डेअरी ब्रँडचे व्यवस्थापकीय संचालक आरएस सोधी यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या ४ वर्षांपासून ते मुदतवाढीवर होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर जयेन मेहता यांच्याकडे व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. काही महिन्यांनंतर अमूलला नवीन एमडी मिळेल. गांधीनगर मधुर डेअरीचे अध्यक्ष शंकरसिंह राणा यांनी याला दुजोरा दिला आहे.

गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) च्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, जो अमूल ब्रँड चालवणारी शेतकरी सहकारी संस्था आहे. GCMMF मुख्यत्वे गुजरात, दिल्ली-NCR, पश्चिम बंगाल आणि मुंबईच्या बाजारपेठेत दूध विकते. ही सहकारी संस्था दररोज १५० लाख लिटरपेक्षा जास्त दुधाची विक्री करते, त्यापैकी सुमारे ४० लाख लिटर दूध दिल्ली-एनसीआरमध्ये विकले जाते.

२०१० मध्ये गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनच्या प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर, आरएस सोधी जवळपास गेली १३ वर्षे कंपनीचे एमडी म्हणून नेतृत्व करत होते. सोधी यांची पहिल्यांदा २०१० मध्ये अमूलच्या सर्वोच्च पदावर नियुक्ती झाली होती. २०१७ मध्ये त्यांना आणखी ५ वर्षांची मुदतवाढ देण्यात आली होती. सोधी हे पहिल्यांदा अमूलमध्ये १९८२ मध्ये वरिष्ठ विक्री अधिकारी म्हणून रुजू झाले. २०००-२००४ पर्यंत त्यांनी महाव्यवस्थापक (विपणन) म्हणून काम केले आणि जून २०१० मध्ये त्यांना व्यवस्थापकीय संचालक पदावर बढती मिळाली.

जयेन मेहता गेल्या ३१ वर्षांपासून अमूलशी संबंधित आहेत. ते सध्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) म्हणून तैनात आहेत. याआधी त्यांनी मार्केटिंग फंक्शनमध्ये कंपनीचे ब्रँड मॅनेजर, ग्रुप प्रॉडक्ट मॅनेजर आणि जनरल मॅनेजर म्हणूनही काम केले आहे.

७८ वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या अमूल ब्रँडची जगभरात ख्याती आहे. २०२२ मध्ये अमूलचा एकूण महसूल ५२ हजार रुपये होता. गुजरातमध्ये अमूलचे सहकार क्षेत्र खूप मोठे आहे. गुजरातमधील बनास आणि दूधसागर डेअरी हे देखील अमूलचे विभाग आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सहकार मंत्रालय आहे.

हे ही वाचा:

जामीन मजूर होऊनही कोचर दाम्पत्यांना कारागृहात काढावी लागणार रात्र

पद्मश्री, ज्ञानपीठ आणि साहित्य अकादमीने सन्मानित कवी रहमान राही यांचे निधन, नेत्यांनी व्यक्त केले शोक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss