Saturday, May 18, 2024

Latest Posts

Biporjoy वादळाचा वाढता धोका! पुढील २४ तासांत दिसू शकते रौद्र रूप

एकीकडे सर्व नागरिकांना पावसाची (Monsoon Update) प्रतिक्षा लागली आहे तर दुसरीकडे आता चक्रीवादळाचा (Cyclone) धोका निर्माण झाला आहे. वादळी वाऱ्यांमुळे मान्सूनही लांबला आहे. मोचा नंतर, आणखी 'Biporjoy' हे चक्रीवादळ देशाच्या किनारी भागांना धडकणार आहे.

Biporjoy Cyclone Update : एकीकडे सर्व नागरिकांना पावसाची (Monsoon Update) प्रतिक्षा लागली आहे तर दुसरीकडे आता चक्रीवादळाचा (Cyclone) धोका निर्माण झाला आहे. वादळी वाऱ्यांमुळे मान्सूनही लांबला आहे. मोचा नंतर, आणखी ‘Biporjoy’ हे चक्रीवादळ देशाच्या किनारी भागांना धडकणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, हे बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी दिनांक जून रोजी त्याचे तीव्र स्वरूप दर्शवू शकते. एवढेच नाही तर दिनांक ९ जून रोजीही हे मोठे रूप धारण करण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम केरळ-कर्नाटक आणि लक्षद्वीप-मालदीवच्या किनारपट्टीवर दिसून येईल. यासोबतच कोकण-गोवा-महाराष्ट्र किनारपट्टीवर दिनांक ८ ते १० जूनदरम्यान समुद्रात खूप उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे.

IMD च्या म्हणण्यानुसार, आग्नेय अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे आणि तीव्रतेमुळे, चक्री चक्रीवादळामुळे केरळ किनारपट्टीवर मान्सूनच्या आगमनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. दिनांक ८ किंवा ९ तारखेला मान्सून केरळमध्ये दार ठोठावू शकतो, मात्र हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तीव्र चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, पुढील तीन दिवसांत बिपरजॉय वादळ उत्तरेकडे सरकणार आहे. भारतीय हवामान खात्याने गुजरातमधील बिपरजॉयबाबत अलर्ट जारी केला आहे. हे चक्रीवादळ गुजरातमधील पोरबंदरच्या नैऋत्येला सुमारे १०६० किमी अंतरावर आहे. दुसरीकडे, राज्य सरकार कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे सांगत आहे. बिपरजॉय (Biporjoy) चक्रीवादळाबाबत भारतीय हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे चक्रीवादळामुळे पुढील २४ तासांत काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच पूर्वमध्य अरबी समुद्रावरील बिपरजॉय चक्रीवादळ गेल्या ६ तासांमध्ये ६ किमी प्रतितास वेगाने जवळजवळ उत्तरेकडे सरकलं आहे. तर या चक्रीवादळामुळे केरळ-कर्नाटक किनारपट्टी आणि लक्षद्वीप-मालदीव आणि कोकण, गोवा किनारपट्टीवर ८ ते १० जूनपर्यंत समुद्रात खूप उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. समुद्रात उतरलेल्या मच्छिमारांना किनाऱ्यावर परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे पाऊस लांबणीवर गेला आहे. हवामान विभागाने केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची संभाव्य तारीख दिलेली नाही.

हे ही वाचा:

मुंबईतील घटनेवरून अमित ठाकरे यांनी व्यक्त केला संताप

ठाकरे पिता-पुत्रांनी डावलले, तिरुपती बालाजीने मात्र स्विकारले!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss