Sunday, May 19, 2024

Latest Posts

Dell Layoff, तब्बल ६६५० कर्मचार्‍यांना डेल काढून टाकणार

सध्या अनेक मोठं मोठ्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचे प्रमाण हे दिवसेंदीवस वाढत चालले आहे.

सध्या अनेक मोठं मोठ्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचे प्रमाण हे दिवसेंदीवस वाढत चालले आहे. मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन ते Amazon.com Inc आणि Goldman Sachs Group Inc या कंपन्यांनी अलीकडेच उच्च महागाई आणि वाढत्या व्याजदरांमुळे ग्राहक आणि कॉर्पोरेट खर्च कमी झाल्यामुळे मागणीतील घट दूर करण्यासाठी हजारो नोकऱ्या कमी केल्या आहेत. यामध्ये आता डेल या कंपनीने देखील नंबर लावला आहे. डेल या कंपनीने तब्बल ६६५० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

डेलकडून जगभरातील एकूण कर्मचाऱ्यांच्या ५ टक्के कर्मचारी कपातीची घोषणा कंपनीने केली आहे. यामुळे जवळपास ६,६०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांना शेअर केलेल्या नोटमध्ये म्हटले आहे की, कंपनी अशा बाजार परिस्थितीचा सामना करत आहे ज्याचा बाजार स्थितीवर परिणाम होत आहे. म्हणजेच, कंपनीच्या छाटणीमागील कारण बाजाराच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. “आम्ही याआधी आर्थिक मंदीचा सामना केला आहे आणि आम्ही अधिक मजबूत झालो आहोत. कोविड साथीच्या आजाराने २०२० मध्ये देखील कंपनीने अशाच प्रकारची टाळेबंदी जाहीर केली होती.

नोव्हेंबरच्या सुरुवातीला, एचपीने सांगितले की ते पुढील तीन वर्षांत किमान ६,००० नोकर्‍या काढून टाकतील, वैयक्तिक संगणकांच्या मागणीत घट झाली आहे, ज्यामुळे नफा कमी झाला आहे. Cisco Systems Inc. आणि इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स कॉर्प. ते सुमारे ४,००० कर्मचार्‍यांना काढून टाकतील असेही सांगितले होते. सल्लागार फर्म चॅलेंजर्स, ग्रे अँड ख्रिसमस इंक.च्या मते, टेक सेक्टरने २०२२ मध्ये ९७,१७१ नोकऱ्या कपातीची घोषणा केली, जी मागील वर्षाच्या तुलनेत ६४९ टक्क्यांनी वाढली आहे.

ग्लोबल टेक कंपनी फिलिप्सनेही टाळेबंदी जाहीर केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ती तिच्या जागतिक मनुष्यबळातून ६,००० लोकांना काढून टाकेल. फिलिप्सचे सीईओ रॉय जेकब्स यांनी २०२५ पर्यंत कर्मचारी संख्येत आणखी कपात करण्याची घोषणा केली आहे. यासह, कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे की स्लीप डिव्हाईस रिकॉल सखोल झाल्यामुळे नवीनतम नुकसानानंतर जगभरातील आणखी ६,००० नोकऱ्या कमी होतील.

हे ही वाचा:

जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटवर गोपीचं पडळकरांचा पवारांना टोला, घाणेरडं राजकारण करणं ही पवारांची कूट नीती ….

Kasba By Poll Election, पोट निवडणुकीच्या रॅलीत गैरहजर राहून टिळक कुटुंबीयांनीची भाजपवर दर्शवली नाराजी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss