Saturday, May 18, 2024

Latest Posts

BBC ला डॉक्युमेंट्री पडली महागात ? देशभरातील कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे

आज BBC या वृत्तसंस्थेच्या संपूर्ण देशभरातील कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे पडल आहे. काही दिवसांपूर्वी बीबीसीने एक डॉक्युमेंट्री प्रदर्शित केली होती. या डॉक्युमेंट्रीचे नाव “इंडिया- द मोदी क्वेश्चन” होते. या डॉक्युमेंट्रीची चांगलीच चर्चा भारतातच नव्हे तर जगभरात सुरु आहे. या माहितीपटातून गुजरात दंगलीदरम्यान गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. याच कारणामुळे भारतात बीबीसीच्या प्रसारणावर बंदी आणावी अशी मागणी केली जात आहे. असे असतानाच आता बीबीसीच्या दिल्लीमधील कार्यालया सहा देशभरातील अन्य कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत.

काही दिवसांपासून बीबीसीने प्रदर्शित केलेल्या “इंडिया- द मोदी क्वेश्चन” या डॉक्युमेंट्रीवरून भारतामध्ये बीबीसी वृत्तसंस्थेचा विरोध करण्यात आला त्याच बरोबर बीबीसीने प्रदर्शित केलेल्या “इंडिया- द मोदी क्वेश्चन” या डॉक्युमेंट्री या डॉक्युमेंट्रीला भारतामध्ये प्रदर्शित करण्यास केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आली. या नंतर या डॉक्युमेंट्री बद्दल खूप मोठ्या प्रमाणात वाद देखील झाला. या डॉक्युमेंट्रीवर जगभरातील अनेक दिग्गज नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. या डॉक्युमेंट्रीमध्ये गुजरात दंगलीदरम्यान गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपथित करण्यात आले आहेत. त्यामुळे या डॉक्युमेंट्री संदर्भात जगातील अनेक दिग्गज नेत्यांनी देखील प्रतिक्रया दिल्या आहेत. त्यानंतर आज बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयांवर आयकारविभागाने छापे टाकले आहेत. या दरम्यान कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल, फोन आयकर विभागाने काढून घेतले आहेत.

असे सांगण्यात येत आहे की आयकर विभागाने कर चुकवेगिरीच्या संशयातून बीबीसीच्या दिल्ली येथील कार्यालयावर छापा टाकला आहे. विभागाची मोठी टीम घटनास्थळी दाखल झाली असून कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली असून BBC चे पुढचे पाऊल काय असेल हे महत्त्वाच ठरणार आहे.

हे ही वाचा : 

Pulwama Attack, चार वर्षांपूर्वी झाला होता हा भ्याड हल्ला

मविआच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीवर नाना पाटोलेंनी दिली प्रतिक्रिया, मी मुख्यमंत्री होण्यासाठी….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss