Saturday, May 18, 2024

Latest Posts

‘या’मुळे करावे लागले इमर्जन्सी लँडिंग

सध्या विमानातील दुर्घटना या वदलेल्या दिसत आहे. विमानाचा प्रवास हा इतका स्वस्त झाला आहे की, सर्रास लोक हि विमानाने जाणे पसंत करतात. कारण कमी वेळेत माणूस पटकन पोहोचू शकतो आणि त्यामुळे आपला वेळ देखील वाचतो.

सध्या विमानातील दुर्घटना या वदलेल्या दिसत आहे. विमानाचा प्रवास हा इतका स्वस्त झाला आहे की, सर्रास लोक हि विमानाने जाणे पसंत करतात. कारण कमी वेळेत माणूस पटकन पोहोचू शकतो आणि त्यामुळे आपला वेळ देखील वाचतो. अशातच सकाळी दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या (Indigo) ६E २४३३ चे फ्लाईटचे पाटणा विमानतळावर (Patana Airport) इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकाराची माहिती देताना पाटणा विमानतळाच्या संचालकांनी सांगितले की, दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट ६E २४३३ मध्ये उड्डाण केल्यानंतर तीन मिनिटांनी त्याच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. याबाबतची माहिती विमानाच्या पायलटने दिला आणि इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली. यानंतर उड्डाणानंतर लगेचच विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले आहे.

दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे सकाळी ९ वाजून ११ मिनिटांनी सुरक्षित लँडिंग करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. विमानाचे इमर्जन्सी लँडिंग झाले तरी विमानतळावरील सर्व कामकाज सुरळीत सुरु आहे. इमर्जन्सी लँडिंगमुळे प्रवाशांमध्ये काहीशी अस्वस्थता पसरली होती. मात्र,सुरक्षित लँडिंग झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. विमानात एकूण १८१ प्रवासी प्रवास करत होते. प्रवाशांमध्ये इमर्जन्सी लँडिंग केल्यामुळे गोनल पसरला होता मात्र वैमानिकाकांकडून विश्वास पटल्यावर प्रवासी काहीसे स्थिरावले. दिल्लीला जाणाऱ्या या इंडिगोच्या विमानाने पाटणा विमानतळावरुन सकाळी ८ वाजून ४८ मिनिटांनी उड्डाण केले होते. या विमानामध्ये एकूण १८१ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच विमानातील तांत्रिक अडचण दूर झाल्याची माहिती देखील विमानतळावरील प्रशासनाने दिली आहे. परंतु हे विमान दिल्लीला पाठवता येणार नाही. त्यामुळे प्रवाशांना दिल्लीला जाण्यासाठी लखनौवरुन विमान मागवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच विमानाने या सर्व प्रवाशांना दिल्लीला जाता येणार आहे.

अशीच एक घटना पाटणा विमानतळावर ५ मे रोजी बांगलादेशच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. हे विमान बांग्लादेशमधून काठमांडूला जात होते. मात्र एका प्रवाश्याच्या वैद्यकीय समस्येमुळे विमानाचे पाटणा येथे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. या विमानामध्ये एकूण ७७ यात्रेकरु प्रवास करत होते. दुपारी १२. ३५ मिनिटांनी या विमानाने बांग्लादेशवरुन उड्डाण केले. दरम्यान प्रवाशांना जवळपास चार तास या विमानामध्ये वाट पाहावी लागली होती. जेव्हा याची माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोलला मिळाली तेव्हा पाटणा विमानतळ विमानाच्या जवळ होते. त्यामुळे पाटणा विमानतळावर विमानाला इमर्जन्सी लँडिंगला करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. परंतु कोणत्याही प्रवाशांना विमानाच्या बाहेर पडण्याची परवनागी देण्यात आली नाही. विमानातच त्यांना आवश्यक गोष्टी पुरवण्यात येत होत्या. मात्र समस्या दूर झाल्यानंतर विमानाने पुन्हा काठमांडूच्या दिशेने उड्डाण केले. दरम्यान पाटणा विमानतळाच्या प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती.

हे ही वाचा:

दहशतवाद्यांकडून 15 ऑगस्टला घातपात घडवण्याचा कट

Pune विमानतळ बॉम्बनं उडवून देण्याची धमकी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss