Monday, May 20, 2024

Latest Posts

टेक्सासमध्ये उंच आकाशात विमानांची धडक; विडिओ कॅमेऱ्यात कैद

अमेरिकेतील टेक्सासमध्ये आकाशात दोन विमाने एकमेकांवर आदळून अपघात झाला आहे. हवेत टक्कर झालेली ही दोन्ही विमाने विंटेज लष्करी विमाने होती जी टेक्सासमधील डॅलस शहरात एअर शोमध्ये सहभागी होण्यासाठी आली होती. एअर शोमध्ये स्टंट करत असताना दोन्ही विमान हवेत आदळले. डॅलसमधील दुसऱ्या महायुद्धाच्या स्मरणार्थ एअर शोमध्ये दोन विंटेज लष्करी विमाने आकाशात एकमेकांवर आदळली. फेडरल अधिकार्‍यांनी सांगितले की, ही लष्करी विमाने स्फोट होण्यापूर्वी जमिनीवर कोसळली. या लष्करी विमानामद्धे ६ जणांचा मृत्यु झाला आहे.

 १२ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. टेक्सासमधील दल्लासमध्ये विंटेज एअर शो सुरू होता. एक बोईंग बी-१७ हवेत स्टंट करत असताना अचानक बेल पी-६३ नावाचं दुसरं विमान या विमानाजवळ आलं आणि काही लक्षात येण्यापूर्वीच बोईंग बी-१७ वर जाऊन आदळलं. दुर्घटनेची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ४० हून अधिक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. घटनास्थळी तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आलं. दोन्ही विमानात पायलटसह ६ जण असल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत सर्वच्या सर्व ६ जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

शनिवारी दुपारी झालेल्या या घटनेत महायुद्धाच्या काळातील बोईंग बी-१७ फ्लाइंग फोर्ट्रेस बॉम्बर आणि बेल पी-६३ किंगकोब्रा फायटर हे डॅलस कार्यकारी विमानतळावरील डॅलस एअरशोवर विंग्सवर उड्डाण करत होते, असे फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) ने सांगितले. विमाने हवेत असताना अचानक ती एकमेकांवर आदळली त्यानंतर खाली पडली आणि मोठा स्फोट झाला. दरम्यान आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. दरम्यान घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन विमाने जमिनीवर एकमेकावर आदळताना आणि खाली पडून पेट घेताना दिसत आहेत.

हे ही वाचा :

कळवा खाडीवर नव्या पूलचं लोकार्पण सोहळा; शिंदे, फडणवीस आणि आव्हाड येणार एकाच मंचावर ?

PAK vs ENG: अंतिम सामन्यात पावसाची शक्यता; जाणून घ्या हवामान अहवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss