Monday, May 20, 2024

Latest Posts

दिव्यांग स्वीगी डिलिव्हरी गर्लचा सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय तुफान वायरल

ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वीगी (Online Platform Swiggy) वरून दररोज हजारो ग्राहक ऑनलाईन जेवण मागवत असतात.

ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वीगी (Online Platform Swiggy) वरून दररोज हजारो ग्राहक ऑनलाईन जेवण मागवत असतात. मात्र एका ग्राहकाने Swiggyवरून जेवण ऑर्डर केले असता डिलिव्हरी एजंट (Delivery Girl) म्हणून काम करणाऱ्या एका दिव्यांग महिलेने जेवणाचं पार्सल घेऊन येणे त्यालाही अपेक्षित नसावं. तिला बघताच त्यालाही धक्का हा नक्कीच बसला. जेथे इच्छा तेथे मार्ग ही म्हण या महिलेने प्रत्यक्षात उतरवल्याचे दिसून येते. या दिव्यांग डिलिव्हरी एजंट महिलेचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये, एक स्विगी सर्व्हिस टी-शर्ट घातलेली दिव्यांग महिला व्हीलचेअरवर (Wheelchair) बसून ग्राहकांच्या ऑडर्स देताना दिसत आहे. एका यूजरने त्याच्या Linkedin अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केलाय. आपण ऑर्डर दिल्यावर वेळेत ऑर्डर डिलीव्हर झाला नाही की डिलीव्हरी गर्ल किंवा बॉयवर ओरडतो. मात्र ते आपलं पार्सल पोहोचवण्यासाठी कठोर परीश्रम घेत असतात. हा मोलाचा संदेश यावेळी या यूजरने सोशल मीडियावर शेअर केलाय.

हा व्हिडिओ जगविंदर सिंग घुमान नावाच्या युजरने लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की, ‘तुम्हाला ऑफिसला उशीर झाला तर तुम्ही फालतू सबबी काढता, पण खरा नायक कठोर परिश्रम करतो आणि त्या बहाण्याकडे दुर्लक्ष करतो.’

लिंक्डइनवर व्हायरल झालेल्या या पोस्टवर यूजर्स उत्साहाने त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘लाखो लोकांना प्रेरणा देत, हे उत्तम प्रकारे दाखवून देते की जर एखाद्यामध्ये जीवनात काहीतरी करण्याची जिद्द आणि इच्छा असेल तर ते एक दिवस त्यांचा मार्ग शोधतील. या दिशेने कंपन्यांनी अधिक पुढाकार घेतला पाहिजे. दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘हे त्यांच्यासाठी आश्चर्यकारक आणि धाडसी आहे. स्विगीला सलाम, कारण त्यांनी त्यांना वेगळे मानले नाही. तिसर्‍या यूजरने लिहिले की, ‘मी त्याचे खूप कौतुक करतो. बाकी सर्वजण खूप मेहनत करत आहेत, आम्ही कष्ट न करण्याचे कारण नाही. तसेच एकाने तिला धाडसी तर दुसऱ्याने तिला कष्टाळू असल्याचे म्हणत तिचे कौतुक केले आहे. अनेक दिव्यांग लोकांसाठी ती एक प्रेरणा ठरत असल्याचेही अनेकांनी यावेळी म्हटले आहे.

हे ही वाचा :- 

आज नीट युजी २०२२ चा निकाल होणार जाहीर

अँम्ब्युलन्सला देखील अमित शाहांच्या जाण्याची पहावी लागली वाट; व्हिडिओ मोठ्या प्रमाणत व्हायरल

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss