Saturday, May 18, 2024

Latest Posts

पिंजऱ्यातील सिंहासोबत मस्ती करणं पडलं महागात; थोडक्यात वाचला

कधी नाकाला तर कधी त्याच्या तोंडात बोटं घालत होता, हे कृत्य काही सिंहाला आवडलं नाही आणि यानंतर...

आत्ता पर्यंत तुम्ही प्राण्यांनी माणसांवर केलेल्या हल्ल्यांच्या अनेक बातम्या वाचल्या असतील. पण ही बातमी पाहून तुमचा संताप झाल्याशिवाय राहणार नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतोय. विडिओ क्लिप बघून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकदा माणसं प्राणी संग्रहालयात फिरण्यासाठी जातात. पण काही जण नको त्या उचापत्या करतात आणि संकटात सापडतात. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.

थरकाप उडवणारा हा व्हिडिओ जमायकाच्या येथील प्राणी संग्रहालयातील आहे. काही जण हे विसरून जातात की वाघ आणि सिंह सारखे प्राणी पिंजऱ्यात असले तरी ते हल्ला करू शकतात. यात एक व्यक्ती दिसत आहे, जो इथे फिरण्यासाठी आला असावा. सर्वजण सिंहासोबत त्याचे फोटो घेत आहेत आणि व्हिडिओ बनवत आहेत. मात्र हा व्यक्ती सिंहाला हात लावून त्याच्याशी खेळत होता. परंतु सिंह मस्तीच्या मनस्थितीत नसल्याचं दिसतंय. हा व्यक्ती सिंहाच्या कधी गालाला तर कधी नाकाला तर कधी त्याच्या तोंडात बोटं घालत होता, हे कृत्य काही सिंहाला आवडलं नाही आणि यानंतर या व्यक्तीसोबत जे काही घडलं, ते बघून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हा व्यक्ती सिंहाच्या पिंजऱ्याबाहेर उभा असल्याचं दिसतं. सिंहाला इतक्या जवळून जाऊन ही या व्यक्तीचं समाधान होत नसल्याने तो पिंजऱ्याच्या आतमध्ये बोटं घालून सिंहासोबत खेळू लागतो. ही गोष्टी जंगलाच्या राजाला अजिबातही आवडत नाही. सुरुवातीला तो काहीच करत नाही, पण थोड्या वेळाने रागावलेला सिंह या व्यक्तीची बोटं आपल्या जबड्यात पकडतो. यानंतर मात्र ही व्यक्ती भीतीने गार पडते. खूप प्रयत्नानंतर तो आपला हात सिंहाच्या जबड्यातून बाहेर काढण्यात यशस्वी ठरतो. मात्र यात त्याच्या हाताच्या बोटाची हाडंच वाचतात आणि मांस सिंहाने ओढून खाल्लेले दिसते. @Morris_Monys ट्विटर अकाऊंटवरून एका यूजरने हा भयानक व्हिडिओ ट्विट केला आहे.

अनेकदा सूचना फलकावर लिहून आणि प्राणी संग्रहालयात वेळो वेळी सूचना देऊन ही काही जणं असे कृत्य करतात तेव्हा त्यांना लोकांच्या रागाला सामोरे जावेच लागते.

Latest Posts

Don't Miss