Sunday, May 19, 2024

Latest Posts

Valentine Day 2023, मुंबईतील ‘या’ हॉटेल्समध्ये करा रोमँटिक डेट प्लॅन

व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) सर्व तरुण मित्र मंडळींसाठी महत्वाचा दिवस आहे. व्हॅलेंटाईन दिनानिमित्ताने लोक व्हॅलेंटाईन डे च्या भेटवस्तू आणि चॉकलेट, कार्ड, फुले, विशेषतः लाल गुलाबांची फुले देऊन आपल्या प्रिय व्यक्तीला खुश करतात. परंतु व्हॅलेंटाईन दिवस हि पाश्चिमात्य संस्कृतीकडून आलेली परंपरा आहे.

व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) सर्व तरुण मित्र मंडळींसाठी महत्वाचा दिवस आहे. व्हॅलेंटाईन दिनानिमित्ताने लोक व्हॅलेंटाईन डे च्या भेटवस्तू आणि चॉकलेट, कार्ड, फुले, विशेषतः लाल गुलाबांची फुले देऊन आपल्या प्रिय व्यक्तीला खुश करतात. परंतु व्हॅलेंटाईन दिवस हि पाश्चिमात्य संस्कृतीकडून आलेली परंपरा आहे. परंतु भारतीय लोक हा दिवस एक आठवडा एखाद्या सणाप्रमाणे साजरा केला जातो. रोमचा सेंट व्हॅलेंटाईन आणि सेंट व्हॅलेंटाईन ऑफ टर्नी, रोमन सम्राट क्लॉडियस याने १४ फेब्रुवारी रोजी फाशी दिली. रोमन लोकांना ख्रिश्चन धर्मात रुपांतरित करण्यासाठी आणि चमत्कार करण्यासाठी दोन्ही व्हॅलेंटाईन्सने आपले डोके गमावले अशी कथा प्रसिद्ध आहे हा दिवस जसा विवध कथांसाठी प्रसिद्ध आहे तसेच भेटवस्तू, व्हॅलेंटाईन साजरी करण्याची पद्धत, संध्याकाळ डेट नाईटसाठी देखील प्रसिद्ध आहे.या दिवशी तरुण तरुणी लेट नाईट डिनर(Late night dinner), कँडल लाईट डिनर (Candle light dinner)सारखे प्लॅन करतात,याचे क्रेझ मुंबईत खूप दिसून येते मुंबईतील मोठमोठया हॉटेल मध्ये कपल च्या रांगा असतात. जर तुम्हालाही या दिवशी अश्या प्रसिद्ध हॉटेल्स मध्ये जायचे असेल तर जाणून घ्या कुठे आहेत हि प्रसिद्ध हॉटेल्स

मरीना अप्पर डेक, कुलाबा (Marina Upper Deck, Colaba)

कुलाबा प्रदेशातील मरीना अप्पर डेक वरून मुंबईच्या आकाशाची अतुलनीय दृश्ये हॉटेल च्या छतावरून दिसतात. उबदार वातावरण, मावळता सूर्य एक योग्य रोमँटिक डेट साठी परफेक्ट जागा आहे. तुम्ही नक्की तुमच्या व्हॅलेंटाईनला घेऊन इथे जावे.

बेव्ह्यू कॅफे, कुलाबा (Bayview Cafe, Colaba)

गेटवे ऑफ इंडिया येथील ताजमहाल हॉटेलच्या रांगेतच समुद्रासमोरच हे हॉटेल आहे. हॉटेलच्या टेरेसवर बसून गरम गरम टी कॉफी घेत असताना ज्याला आराम करण्यासाठी आणि वारा आणि समुद्रात जाण्यासाठी हलक्या मंद वातावरणाची गरज आहे, त्याने इथे नक्की जावे हि जागा कँडल लाईट डिनर साठी योग्य जागा आहे.

डोम इंटरकॉन्टिनेंटल, चर्चगेट (Dome Intercontinental, Churchgate)

मैत्रीपूर्ण कर्मचारी सेवा, उत्कृष्ट सजावट, केशरी रंगाचे आकाश , मावळतीचा सूर्य आणि आश्चर्यकारक देखावा आणि अनुभव, मुंबईतील कपल या एका लोकप्रिय रेस्टॉरंटची ही निश्चित वैशिष्ट्ये आहेत.

हे ही वाचा : 

Narendra Modi In Mumbai, ‘मोदींच मिशन मुंबई’, जाणून घ्या प्रत्येक अपडेट एका क्लिकवर…

Google Doodle ने मल्याळम सिनेमातील पहिल्या महिला लीडचा केला सन्मान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss