Saturday, May 18, 2024

Latest Posts

मॅगी विथ पान मसाला; मुलाने केला विचित्र प्रकार

व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. इंदोर मधील एका युवकाने मॅगी मध्ये विमल पान मसाला टाकून चक्क ...

झटपट होणारा आणि नाश्ताला बऱ्याच जणांचा आवडता पदार्थ म्हणजे मॅगी. फक्त दोन मिनिटांमध्ये बनणारी मॅगी हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अलीकडेच मॅगीवरील वेगवेगळ्या प्रयोगाचे व्हिडीओ समोर आले आहेत. आता पुन्हा एकदा मॅगीवर नवीन प्रयोग करण्यात आला आहे. हल्ली हीच मॅगी सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे. सध्या सोशल मीडियावर मॅगीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. इंदोर मधील एका युवकाने मॅगी मध्ये विमल पान मसाला टाकून एक विचित्र प्रयोग केला आहे.

Viral Vimal Masala Maggi Video

r_bam_tv7 या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये युवकाने विमल चे पॅकेट फोडून मॅगी मध्ये टाकले. त्यानंतर तो युवक ही मॅगी चवीने खाताना दिसतोय. या व्हिडिओ ला आतापर्यंत ७६ हजार पेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर देखील केला आहे. व्हिडिओ खाली अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ इंदोर मधील असल्याचे बोलले जातेय. अनेक जणांनी कमेंट मध्ये हा विचित्र प्रकार पाहून संताप ही व्यक्त केला आहे.

हा असा व्हायरल झालेला पहिलाच व्हिडिओ नाही. या आधी ही या युवकाने आईस्क्रिमवरही हा विचित्र प्रयोग केला आहे. कुल्फीसोबत विमल मिसळून त्यानं विमल आईस्क्रिम बनवलं आहे. या आधीही आईस्क्रिमसोबक विचित्र प्रयोग करण्यात आले आहेत. त्यामध्ये मिरची आईस्क्रिम आणि गाजर हलवा आईस्क्रिम व्हायरल झालं होतं

 

Latest Posts

Don't Miss