ये रे ये रे पावसा…!, पुढील २४ तासात अंदमानात पावसाचे होणार आगमन

तुम्ही जर उकाड्यानं हैराण झाले आहात तर बातमी खास तुमच्या साठी आहे. प्रत्येक नागरिकांसाठी हि सर्वात मोठी आणि तितकंच आनंदाची बातमी आहे.

ये रे ये रे पावसा…!, पुढील २४ तासात अंदमानात पावसाचे होणार आगमन

तुम्ही जर उकाड्यानं हैराण झाले आहात तर बातमी खास तुमच्या साठी आहे. प्रत्येक नागरिकांसाठी हि सर्वात मोठी आणि तितकंच आनंदाची बातमी आहे. लांबणीवर गेला असं म्हणता म्हणता मान्सूनचे आगमन हे लवकरच आता होणार आहे. पुढील २४ तासात अंदमान निकोबार बेट समुहात मान्सून दाखल होणार आहे अशी माहिती IMD नं दिली आहे.

यंदा मान्सूनची तारीख लांबणीवर गेली आहे अशी माहिती २- ३ दिवसांपूर्वी आयएमडी आणि स्कायमेट (Skymet) यांच्याकडून सांगण्यात आले होते. परंतु आता मान्सून अंदमानात वेळतच दाखल होत असल्याचं चित्र अखेर स्पष्ट होत आहे. इथून पुढं म्हणजेच केरळच्या किनारपट्टीवर मान्सून ३ ते ४ जूनपर्यंत दाखल होईल. आणि त्यानंतरच काही दिवसांनी तो महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचणार आहे.

तसेच यंदाच्या वर्षी जर मान्सून ठरलेल्या वेळेत दाखल झाला आणि वर्तवलेल्या अंदाजानुसार बरसला तर, हे प्रमाण ९६ टक्क्यांच्या घरात राहू शकतं असा अंदाज हवामान विभागानं वर्तवत हा मान्सून सामान्य असेल अशी शक्यता वर्तवली आहे. मान्सून प्रवासाच्या पहिल्याच टप्प्यात आहे. तर मान्सून निकोबार, अंदमानचा दक्षिण भार आणि बंगालच्या उपसागर क्षेत्राला व्यापणार आहे. परिणामी पुढच्या ५ दिवसांमध्ये केरळच्या विविध भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या येण्याची बातमी मिळेल असं सांगण्यात येत आहे. देशभरात सध्याच्या घडीला असणारं तापमान पाहता पर्वतीय क्षेत्र वगळता बहुतांश भागांमध्ये आर्द्रतेचं प्रमाणही जास्त असेल.

हे ही वाचा : 

RCB vs SRH, कोहली मारणार बाजी की शेवटच्या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद होणार विजयी

भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना दिले भामट्यांकडून खबरदारी बाळगण्याचे आव्हान

शुभमन गिलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version