Saturday, May 4, 2024

Latest Posts

महाराष्ट्रात भाजप किती जागा लढवणार, देवेंद्र फडणवीस म्हणाले,

देशाचा विकास फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हेच करू शकतात अशी खात्री असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले आहे.

देशाचा विकास फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हेच करू शकतात अशी खात्री असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले आहे. देशाची सूत्र पुन्हा एकदा मोदीजींच्या हातात द्यायची आहे. त्यामुळे पुढचे ९ ते १० महिने पूर्ण वेळ आपण पक्षासाठी देणे गरजेचे असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या आपण किती जागा लढवणार याची चर्चा सुरु आहे. पण तुम्ही काळजी करु नका तुमच्या मनात जेवढ्या जागा तेवढ्या जागा आपल्या मिळणार फडणवीस म्हणाले आहेत.

आपल्यात तीन राज्यांचा विजयाचा उत्साह आहे. लोकसभेच्या निवडणुकीचं आव्हान आहे. जनतेन ठरवलं आहे की देशाची सुत्र पुन्हा मोदींच्या हातात द्यायची, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख भाजप पदाधिकााऱ्यांची बैठक आयोजीत केली आहे. या बैठकीमध्ये फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसह शरद पवार आणि काँग्रेसवरही जोरदार टीका केली आहे.सत्तेच्या राजकारणात आपले अस्तित्व कसे टिकवायचे याची काळजी विरोधकांना वाटत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.राहुल गांधी हे ईश्वरानं आपल्याला दिलेलं वरदान आहे. विरोधी पक्षाचा प्रमुख असावा तर असा असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. सगळीकडे काँग्रसची अवस्था अशीच आहे. काँग्रेसने केवळ स्वत:चा विचार केला असे फडणवीस म्हणाले. काँग्रेसचे नेते मोठे झाले पक्ष लहान झाल. त्यामुळं सध्या काँग्रेस पक्ष वर येणं कठीण असल्याचे फडणवीस म्हणाले. भाजपमध्ये सगळ्यात ताकदवान हा सामान्य कार्यकर्ता असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपलं एकच काम आहे की, देश पुन्हा मोदीजींच्या हातात द्यायचा आहे. ही निवडणुक भाजपसाठी नाहीतर भारतासाठी लढायची असल्याचे फडणवीस म्हणाले. सध्या इंडिया आघाडीकडून मोदींना हरवण्याची भावना तयार केली जात आहे. त्यांच्यासमोर अजेंडा नाही. ते देशासाठी नाही, गरीबी निर्मुलनासाठी नाही तर परिवार वाचवण्यासाठी पुढे आल्याचे फडणवीस म्हणाले. मोदींना हटवले नाहीतर परिवारवादी पार्टीला कुलपं लागतील यासाठी विरोधक एकत्र आल्याची टीका फडणवीसांनी केली.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री प्रचारासाठी गेले मात्र दुसरे गेलेच नाही – जयंत पाटील

दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार महाराष्ट्राची लाडकी अप्सरा!,सोनालीने व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss