आमच्यावेळी निधीची कमतरता, मग आता जाहिरातींवर उधळपट्टी का?, Rohit Pawar यांचा सरकारला सवाल

आमच्यावेळी निधीची कमतरता, मग आता जाहिरातींवर उधळपट्टी का?, Rohit Pawar यांचा सरकारला सवाल

वर्तमानपत्रात शासनाच्या जाहिराती आणि भले मोठे फोटो छापून उधळपट्टी करण्याचा नवा मार्ग सरकारला सापडला असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो अपलोड करत इतक्या जाहिराती द्यायची गरज आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.

रोज कोट्यवधीच्या जाहिराती देऊन, फुल पेज फोटो छापून अजूनही मन भरत नाही, त्यामुळेच आता नव्याने ८४ कोटींच्या खर्चाची उधळपट्टी करणारी विशेष प्रसिध्दी मोहीम सरकारने काढली असावी. एवढ्या जाहिराती द्यायची गरज आहे का? असा प्रश्न पडत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. जाहिराती देण्याबाबत आमचा आक्षेप नसल्याचे सांगत जेव्हा सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन आम्ही सरकारकडे जातो तेव्हा निधीची अडचण सांगितली जाते आणि मग आता जाहिरातींवर अशा प्रकारची उधळपट्टी का ? असा प्रश्न रोहित पवार यांनी सरकारला विचारला आहे. लोकसभेच्या प्रचारासाठीची प्रसिद्धी शासकीय खर्चातून तर केली जात नाही ना? हेच का तुमचं सर्वसामान्यांचं सरकार? असे रोहित पवार सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणाले.

काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी दवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र उगारले होते. फडणवीसांनी महाराष्ट्रातून एकता-समानता नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती अन् संस्कृती खराब करण्यास फडणवीसचं जबाबदार आहेत, असे रोहित पवार यांनी यांनी म्हटले होते. तसेच, सागर बंगला नेत्यांना वाचवण्यासाठी आहे, सागर बंगला हा आमदारांना वाचवण्यासाठी आहे, सागर बंगला हा कुटुंब फोडण्यासाठी आहे. पण, गरिबांना ज्या अडचणी आहेत, त्यासाठी सागर बंगला काहीही मदत करत नाही, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते.

 

Exit mobile version