Friday, May 17, 2024

Latest Posts

‘कॉफी विथ करण’ मध्ये ‘या’ अभिनेत्रींनी करण ला केले ट्रोल

होस्ट करण जोहरला त्याच्याच शोमध्ये अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे.

मुंबई: करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण’ सुरू झाला आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट या शोचे पहिले पाहुणे कलाकार म्हणून दिसले होते. दुसरीकडे, जान्हवी आणि साराने त्यांच्या येण्याने लोकांचे मनोरंजन केले. आता सातव्या सीझन मध्ये साऊथ स्टार समंथा रुथ प्रभू आणि अक्षय कुमार या शोचा भाग असणार आहेत.

‘समंथा प्रभू’
कॉफी विथ करण सीझन 7 चर्चेत आहे, शो संबंधित अनेक प्रोमो, व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये पहिल्यांदाच अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिने करण जोहरची शाळा घेतली आहे. करणच्या शोमध्ये खिल्ली उडवण्याची ही पहिलीच वेळ नाही. खरं तर याआधीही होस्ट करण जोहरला त्याच्याच शोमध्ये अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे.

‘करीन कपूर’
कॉफी विथ करणमध्ये करीना कपूर खान ने सर्वात जास्त करण ला बोल सुनावले. शोमध्ये तिने करणला ट्रोल करण्याची एकही संधी सोडली नाही. ती म्हणाली, ‘करण तू प्रत्येक जाहिरातीत, प्रत्येक चॅनलवर, प्रत्येक टीव्ही शो मध्ये काम करतोस. माझी आई म्हणते की, मी टीव्ही चालू करते आणि करण जोहर सगळीकडे दिसतो.

‘ट्विंकल खन्ना’
ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार यांचा कॉफी विथ करणवरील एपिसोड हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट एपिसोड मानला जातो. तिने करण जोहरला रोस्ट केले होते.

‘कंगना रणौत’
कंगना रणौतने ‘कॉफी विथ करण’ या टॉक शोमध्ये नेपोटिझमवर भाष्य केले. कॉफी विथ करण मध्ये येऊन कंगनाने करण जोहरला अगदी सडेतोड उत्तर दिले. कंगनच्या युनिक स्टाईलने इंडस्ट्रीत सुरू असलेल्या सगळ्या प्रकरणावर ती बिनधास्त पद्धतीने बोलली. जर कंगनावर चित्रपट बनला तर ती करणला माफिया म्हणून सादर करेल, असेही तिने सांगितले.

Latest Posts

Don't Miss