Tuesday, April 23, 2024

Latest Posts

आगामी निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना कोकणाची आठवण झाली: उद्धव ठाकरेंवर भाजपकडून टीका

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. या दौऱ्यात त्यांनी मालवणसह सिंधुदुर्ग या ठिकाणी सभा घेतली आहे.आगामी निवडणुकीच्या पार्शवभूमीवर त्यांनी त्यांचा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. रविवारी कोकणात झालेल्या सभेमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेला भाजपकडून जश्यास तसे उत्तर देण्यात आले आहे. सत्तेसाठी सोनिया सेनेपुढे गुडघे टेकून भगव्याला छेद देण्याचे पाप कुणी केले?, असे म्हणत भाजपने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

भाजपने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, मुख्यमंत्री असताना कोकणातील मराठी माणसाला वाऱ्यावर सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंना निवडणुका तोंडावर असताना कोकणाची आठवण झाली. उद्धव ठाकरे तुम्ही फक्त भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता, प्रत्यक्ष कृतीत मात्र तुम्हाला औरंग्याबद्दलचं प्रेम दिसून येते. भाजपचे सुरूवातीपासून भगव्यावर प्रेम आहे आणि कायम राहणार. सत्तेसाठी सोनिया सेनेपुढे गुडघे टेकून भगव्याला छेद देण्याचे पाप कुणी केले? हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. देवेंद्रजींवर पाव उपमुख्यमंत्री म्हणून टीका करण्याआधी तुमच्या शिल्लक सेनेची काय अवस्था झाली ते बघा. सच्चा शिवसैनिकानं तुमची साथ कधीच सोडलीय. आता तुमच्याकडे पाव सेनाही उरलेली नाही, असे म्हणत भाजपने उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावेळी सावंतवाडीमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना मला सांगायचं आहे, तुम्ही पाव मुख्यमंत्री झालात. पुन्हा येईल घोषणा करतांना मोठे होता. पण आता तुम्ही त्यांना काय म्हणता. घोषणा करतांना काय होते आणि आता झाले चिराग, एवढा तो टरबूज आणि त्याचे झाले चिराग, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. एवढा करूनसुद्धा तुम्हाला काही पचत नाही. तरी तुम्ही फोडाफोडीचे धंदे करता. मी आजारी असतांना काही हालचाल करू शकत नव्हतो, तेव्हा तुम्ही हुडी वैगरे घालून रात्रीच्या ज्या करामती केल्या, त्याच आता तुमच्या पक्षावर उलटल्या आहेत. तुमचाच पक्ष संपला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा: 

पत्नीच्या ‘त्या’ फोटोमुळे अचानक ट्रेंडमध्ये आला Irfan Pathan

हे कृत्य म्हणजे चोरी नाही तर शासनावर टाकलेला डाका – Girish Mahajan

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss