Saturday, May 18, 2024

Latest Posts

 केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर बंदी

सर्वसामान्याना एन दिवाळीच्या सणात साखरेच्या किंमतीत बदल पाहायला का ? आज केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीबाबत मोठी घोषणा केली आहे.

सर्वसामान्याना एन दिवाळीच्या सणात साखरेच्या किंमतीत बदल पाहायला का ? आज केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीबाबत मोठी घोषणा केली आहे. साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ ऑक्टोबर २०२३ नंतरही देशातून साखरेच्या निर्यातीवर बंदी कायम राहणार आहे. यामध्ये कच्ची साखर, शुद्ध साखर, पांढरी साखर आणि सेंद्रिय साखर यांचा समावेश आहे.

सणासुदीच्या काळात साखरेचे दर वाढल्याने सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवीन साखर हंगामात साखर निर्यातीवर बंदी घालण्याची शक्यता वर्तवली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं जागतिक स्तरावर अन्नधान्याची महागाई वाढण्याचा धोका अधिक तीव्र झाला आहे.


सध्या सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. मात्र, महागाईमुळे लोकांच्या खिशाला कात्री लागत आहे. विशेषत: खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळं लोक हैराण झाले आहेत. दरम्यान, साखरेच्या किंमतीत वाढ झाल्यामुळं अन्न पदार्थांच्या किंमतीत वाढ होत आहे. जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किंमती गेल्या १३ वर्षातील सर्वोच्च आहेत. त्यामुळं देशांतर्गत बाजारावरही दबाव येत आहे.

 

Latest Posts

Don't Miss