Saturday, May 18, 2024

Latest Posts

Budget 2023, यंदाच्या अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाची घोषणा?

यावर्षी अर्थसंकल्प अवघ्या दोन ते तीन दिवसात सादर होणार आहे. यावर्षीचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांना खुश करणार कि नाराज करणार या गोष्टीकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

यावर्षी अर्थसंकल्प अवघ्या दोन ते तीन दिवसात सादर होणार आहे. यावर्षीचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांना खुश करणार कि नाराज करणार या गोष्टीकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. परंतु आता एक चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे ती म्हणजे यंदाचा अर्थसंकल्प हा सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करणार. म्हणजेच यंदाच्या अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या अनेक दिवसंपासून सरकारी कर्मचारी हे ८ वे वेतन आयोग लागू करण्याची मागणी करत आहेत. सध्या आपल्या देशात सातवा वेतन आयोग सुरू आहे.जर यंदाच्या वर्षी सरकारने ८ वा वेतन आयोग जाहीर केलं तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते. जर ८ वे वेतन चालू झाले तर खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंतच्या सरकारी अधिकाऱ्यांचे पगार वाढतील. यामुळे पर्यायाने महागाई देखील वाढणार आहे. सरकारचा खर्च वाढेल, त्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्यांना कररुपी बसणार आहे. आपल्या देशात दर दहा वर्षांनी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग दर लागू केला जातो. ५ व्या, ६ व्या आणि ७ व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीत हा प्रकार आतापर्यंत दिसून आला आहे.२०२३ मध्ये ८ वा वेतन आयोग स्थापन केला जाईल आणि त्याच्या शिफारशी २०२६ मध्ये लागू केल्या जातील असा अंदाज कर्मचाऱ्यांनी पूर्वी व्यक्त केला होता.

या वर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२३ रोजी सादर होणार आहे आणि मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही सादरीकरण सहसा सकाळी ११ वाजता सादर होईल. हे सादरीकरण सहसा अर्थसंकल्पीय अधिवेशन किंवा संसदीय अधिवेशनाच्या अगदी सुरवातीला केले जाते. केंद्रीय अर्थसंकल्प संसदीय अधिवेशन ३१ जानेवारीला होणे अपेक्षित आहे आणि अर्थसंकल्प १ फेब्रुवारी सादर केली जाईल.

हे ही वाचा:

लोकसभा निवडणुकांच्या सर्व्हेतच सी वोटरने घातलाय घोळ । Eknath Shinde । Uddhav Thackeray ।

जितेंद्र आव्हाडांचा सहाय्यक आयुक्तांवर गंभीर आरोप, क्लिप केली जाहीर

मेट्रोचा दुसरा टप्पा मुंबईकरांसाठी ठरला वरदान, आठ दिवसांत तब्बल १० लाख प्रवाशांनी केला प्रवास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss