Thursday, May 16, 2024

Latest Posts

UNION BUDGET 2023, अर्थसंकल्प सादर करण्याआधी त्याची गुप्तता कशी राखली जाते?

केंद्रीय अर्थसंकल्प (Union budget) हा शब्द आपल्यासाठी काही वेगळा नाही आहे. दरवर्षी अर्थसंकल्प सादर केला जातो. बजेट हे आज सुद्धा पारंपारीक पद्धातीने आणि गोपनीयतेशी (Privacy) जोडले आहे. प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प तयार होतो.

केंद्रीय अर्थसंकल्प (Union budget) हा शब्द आपल्यासाठी काही वेगळा नाही आहे. दरवर्षी अर्थसंकल्प सादर केला जातो. बजेट हे आज सुद्धा पारंपारीक पद्धातीने आणि गोपनीयतेशी (Privacy) जोडले आहे. प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प तयार होतो. अश्यावेळी जेव्हा अर्थसंकल्प तयार होत असतो तेव्हा अर्थमंत्रालयाची मुख्य इमारत पूर्णपणे बंद करण्यात येते. सर्व अधिकाऱ्यांना वारंवार सांगण्यात येते की , जास्तीत जास्त गोपनीयता बाळगा. त्यासाठी अनेक सूचना सुद्धा दिल्या जातात. या सर्व नागरिकांवर बारिकतेने लक्ष ठेवले जाते. एवढेच नाही तर अर्थसंकल्पाची कॉपी काही तासांपूर्वी तुमच्या हाती लागली तरीसुद्धा जोपर्यंत तो भाग अर्थसंकल्पेमध्ये सादर केला जात नाही तोच पर्यंत तुम्ही ते पब्लिश करू शकत नाही. अनेकदा अनेक वरिष्ठ पत्रकारांना अर्थसंकल्पेची कॉपी आधीच मिळते पण त्यांच्यावर सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्याची बारीक नजर असते. कारण बजेट सादर होण्याआधी त्या भागाचा कोणताही मजकूर छापला जाऊ नये याची विशेष काळजी घेतली जाते. अश्या प्रकारची विशेष गोपनीयता ठेवण्यामागचं खर कारण म्हणजे जो पर्यंत अर्थमंत्री अर्थसंकल्पनेविषयी भाषण सादर करत नाही तो पर्यंत या अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये याची काळजी घेतली जाते.

हे ही वाचा: Union Budget 2023-24 Live Updates, यंदाच्या बजेटची प्रत्येक लाईव्ह अपडेट घ्या जाणून…

१८५० च्या दशकातून ही परंपरा चालू आहे. ग्रेट ब्रेटन (great britain) मधील त्यावेळेसचे विलियम ग्लेडडस्टोन (William Gladstone) हे १८५२ ते ५५ पर्यंत राजकोषाचे चान्सलर होते. विलियम हे नंतर पंतप्रधान सुद्धा बनले. ग्लेडडस्टोन याच्या काळापासूनच हि परंपरा सुरु करण्यात आली. जोपर्यंत अर्थमंत्री चान्सलर हे अर्थसंकल्प सादर करणार तोच पर्यंत सरसंकपणेच कोणताही भाग पब्लिश होणार नाही हे सांगितले गेले होते. १९४७ मध्ये चान्सलर ह्यूग डाल्टन (Chancellor Hugh Dalton) हे त्या वर्षीचा अर्थसंकल्प सकाळी सादर करणार होते. पण त्यांनी त्याआधीच एका पत्रकाराला त्या अर्थसंकल्पामधील काही भाग त्याला सांगितले. आणि तो अर्थसंकल्प लीक झाली आणि लीक झाल्या कारणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. पत्रकाराने चान्सलर ह्यूग डाल्टन यांनी अर्थसंकल्प सादर करण्याआधीच त्या सर्व तरतुदी आधी वर्तमानपत्रामध्ये छापल्या होत्या आणि लोकांना त्या अर्थसंकल्पने बद्दल आधी समजले होते. भारतामध्ये सुद्धा अर्थसंकल्पानेच काही भाग १९५० मध्ये लीक झाला होता. त्यामुळेच अर्थसंकल्प छापण्याचे काम राष्ट्रपतीभवनावर म्हणजेच गव्हर्मेंट प्रेस रोड येते शिफ्ट करण्यात आले. खरेतर १९८० नंतर अर्थसंकल्प नॉर्थ ब्लॉकच्या बेसमेंट मधूनच छापण्यात येऊ लागला.हलवा सेरेमनीच्या नंतर अर्थसंकल्पना प्रिंट करणाऱ्यांना अधिकाऱ्यांना अर्थमंत्रालयाच्या बेसमेंटमध्येच क्वारंटाईन करण्यात येते. आणि त्यापुढील दहा दिवसापर्यत त्या अधिकाऱ्यांना बेसमेंटमध्ये आपल्या कुटूंबापासून आणि इतर लोकांपासून संपर्क साधता येत नाही.

१९९७ ते २००७ पर्यंत राजकोषचे चांसलर राहिलेले गॉर्डन ब्राउन जेव्हा पंतप्रधान बनले तेव्हा त्यांनी या बजेट पडदा म्हणून जी सिस्टम होती त्या पद्धतीला पूर्णविराम दिला. आता तेथे अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण माहिती दिली जाते आणि त्यावर चर्चा सुद्धा केली जाते. अशा पद्धतीने लोक अर्थसंकल्पासंदर्भातील ज्या काही महत्त्वपूर्ण घोषणांबद्दल गोष्टी होत्या त्या सर्व बाबीं लोकांना आधीच कळून जायचे.

हे ही वाचा:

Union Budget 2023-24 Live Updates, यंदाच्या बजेटची प्रत्येक लाईव्ह अपडेट घ्या जाणून…

बाजारातून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी बनवा पौष्टिक बटर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss