Thursday, May 16, 2024

Latest Posts

Union Budget 2023, अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी रोजी सुरु होऊन ‘या’ दिवशी होईल सादर

२०२३-२३ या आर्थिक वर्षाचा हा केंद्रीय अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वीचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत हा सरकारचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल. जगभरातील वाढती महागाई, मध्यवर्ती बँकेने व्याजदरात केलेली वाढ यामुळे विकासावर कोणताही परिणाम होऊ न देता विकासाचा वेग कायम राखण्यावर सरकारचे लक्ष असेल. २०२३-२३ या आर्थिक वर्षाचा हा केंद्रीय अर्थसंकल्पाचे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी २०२३ पासून सुरु होणार आहे. ही सुनावणी थेट एप्रिल २०२३ पर्यंत चालणार आहे. ही माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करत पुरवली आहे. आणि “अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि केंद्रीय अर्थसंकल्प आणि इतर संसदीय कामकाजावरील आभारप्रदर्शनाबद्दल मी आशावादी आहे”. असे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी त्यांच्या ट्विट मध्ये सांगितल आहे.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनची सुरुवात ३१ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे. आणि १ फेब्रुवारी २०२३ रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२३-२४, या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला हा भाग १३ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून दुसरा भाग १३ मार्चपासून ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात ६६ दिवसांच्या २७ बैठका होणार आहेत.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनाला अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संबोधित करतील. केंद्र सरकार अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी आर्थिक सर्वेक्षण सादर करते. ३१ जानेवारी २०२३ रोजी २०२३-२४ चा आर्थिक सर्वेक्षण हे सरकारकडून सादर केले जाईल.

हे अधिवेशन तब्बल ६६ दिवस सुरु असेल आणि यामध्ये २७ बैठका होणार आहे. तसेच २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांना अनुदानाच्या मागण्या तपासण्यासाठी आणि त्यांच्या मंत्रालये किंवा विभागांशी संबंधित अहवाल तयार करण्यासाठी १४ फेब्रुवारी ते १२ मार्च पर्यंत सुट्टी असेल. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या भागादरम्यान, दोन्ही सभागृहांमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर सविस्तर चर्चा केली जाईल आणि नंतरच केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा केली जाईल.

हे ही वाचा:

MPSCकडून मेगा भरती घोषणा, तब्बल इतक्या पदांसाठी होणार भरती

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या साखरपुड्याला तारे-तारकांचा मेळा, शाहरुख-सलमानसह या स्टार्सनी लावली हजेरी

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा सोहळा दिमाखात पडला पार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss