Tuesday, May 14, 2024

Latest Posts

सिद्धार्थ चांदेकरची भावूक पोस्ट

जुनं घर सोडताना सिद्धार्थ आणि मितालीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित घराबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा सोशल मीडियावर बराच ऍक्टिव्ह राहत असून तो अनेक मजेशीर व्हिडीओ आणि पोस्ट लिहून शेअर करत असतो. अनेक चाहत्यांना देखील सिद्धार्थ च्या पोस्ट आवडतात. सिद्धार्थ अनेकदा त्याच्या घराच्या खिडकीचे व्हिडीओ आणि तिथे बसुन फोटोज काढुन शेअर करत असतो. तर आता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे त्यांचं जुनं घर सोडून नवीन घरात राहायला जात आहेत. जुनं घर सोडताना सिद्धार्थ आणि मितालीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित घराबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनीसुद्धा कमेंट्स केल्या आहेत. सिद्धार्थ ने पोस्ट करत लिहिले आहे की,तुला सोबत घेऊन जाता येणं शक्य नाही म्हणून, नाहीतर एका छोट्या पोतडीत बांधून कायमचं घेऊन गेलो असतो. किती काय काय पाहीलंयस तू. किती काय काय दाखवलंयस तू. किती लोक, किती प्रेम, किती भांडणं, किती अडचणी, किती आनंद. कित्ती कित्ती आठवणी. स्वप्नात येशील तेव्हा तुझ्याच एका कोपऱ्यात एका भिंतीला डोकं टेकवून बसेन. तुझ्या रंगावरून, फरशीवरून हात फिरवेन. मुटकुळं करून तुझ्या खिडकीशी झोपून जाईन.
तेव्हापण असंच थोपट.. जसं इतकी वर्ष केलंस. तुझा वास, तुझी धूळ, मुठीत घट्ट पकडून नेतोय. ज्या नवीन घरात चाललोय त्याला तुझ्या गोष्टी सांगेन. तुझ्या सारखं मिठी मारायला शिकवेन. आमच्यानंतर जे येतील त्यांना असंच प्रेम दे. पण आम्हाला विसरू नकोस. नीट राहा. नीट राहूदे.ही पोस्ट वाचून अनेक चाहते तसेच अभिनेते हळवे झाले आहेत. आतापर्यंतची सर्वात सुंदर पोस्ट अशी कमेंट अभिनेता जितेंद्र जोशी ने केली आहे.

Latest Posts

Don't Miss