सीबीआयच्या पाच तासाच्या चौकशी नंतर, वानखेडे होणार का निलंबित?

आर्यन खान (Aryan khan) प्रकरणाच्या चर्चाना आता पुन्हा उधाण आले आहे. आर्यन खानची सुटका करण्यासाठी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी शाहरुखच्या (Shahrukh khan) मॅनेजर सोबत २५ करोडची दिल करण्याच्या प्रकरणी सीबीआयनं समीर वानखेडेची यांची चौकशी सुरु केली आहे.

सीबीआयच्या पाच तासाच्या चौकशी नंतर, वानखेडे होणार का निलंबित?

आर्यन खान (Aryan khan) प्रकरणाच्या चर्चाना आता पुन्हा उधाण आले आहे. आर्यन खानची सुटका करण्यासाठी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी शाहरुखच्या (Shahrukh khan) मॅनेजर सोबत २५ करोडची दिल करण्याच्या प्रकरणी सीबीआयनं समीर वानखेडेची यांची चौकशी सुरु केली आहे. समीर वानखेडे यांच्या या प्रकरणामुळे अनेक गोष्टी समोर येत आहेत. समीर वानखेडेची आज सीबीआयने ५ तास कसून चौकशी केली आहे. या चौकशीमधून समीर वानखेडे यांचं या प्रकरणांमधून सुटका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर सीबीआय पुन्हा एकदा समीर वानखेडेंना चौकशीला बोलावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

समीर वानखेडे यांचे वकील आर्यन खानच्या प्रकरणामध्ये म्हणाले की, लावलेले सर्व आरोप हे खोटे आहेत. शाहरुखच्या चॅटमध्ये आमिषाचा उल्लेख केलेला नाही असे ते म्हणाले. सीबीआयला देखील विचारणा केली. त्यांचे वकील हजर होते. ही पूर्ण केस, जे आरोप समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आले आहेत ते चुकीचे आहेत असे समीर वानखेडे यांचे वकील म्हणाले. चार महिन्यानंतर हि तक्रार दाखल करण्यात आली आहे त्याला अर्थ नाही जर लाच घेणारा आहे तर लाच देणारा पण कोणीतरी असेल ना? असा प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकरणामध्ये समीर वानखेडे यांच्यावर खंडणी आणि भ्रष्टाचाराचे आरोप देखील करण्यात आले होते. त्याचबरोबर त्यांच्यावर फआयआर देखील दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा : 

RCB vs SRH, कोहली मारणार बाजी की शेवटच्या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद होणार विजयी

भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना दिले भामट्यांकडून खबरदारी बाळगण्याचे आव्हान

शुभमन गिलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version