Friday, May 17, 2024

Latest Posts

बॉलीवूड king khan चा येणार नवीन चित्रपट; निर्माते रितेश सिधवानी यांनी दिली माहिती

बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच आपला सर्वांचा लाडका शाहरुख खान याचा एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख खान याचे सर्वच चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस येतात. त्याच्या चित्रपटांना नेहमीच चांगले यश मिळते मात्र काही वर्षात त्याच्या चित्रपटांना हवे तसे यश मिळत नव्हते.

बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच आपला सर्वांचा लाडका शाहरुख खान याचा एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख खान याचे सर्वच चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस येतात. त्याच्या चित्रपटांना नेहमीच चांगले यश मिळते मात्र काही वर्षात त्याच्या चित्रपटांना हवे तसे यश मिळत नव्हते. मात्र जानेवारीत प्रदर्शित झालेला किंग खानचा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. पठाण चित्रपमध्ये शाहरुख खान (शाहरुख khan)सोबतच दीपिका पदुकोण (dipika padukon) हि आपल्याला मुख्य भूमिकेत दिसली. पठाण या चित्रपटाला बॉक्स ऑफिस वर तुफान प्रतिसाद मिळाला. पठाण च्या घवघवीत यशानंतर शाहरुखानचे नवे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. शाहरुख खानच्या २००६ साली प्रदर्शित झालेल्या डॉन (Don) हा चित्रपट चांगलाच गाजला होता. आतापर्यंत डॉन या सिनेमाचे दोन भाग हे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत मात्र आता शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक खास बातमी आहे. लवकरच डॉन चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांना लवकरच बघायला मिळणार आहे.

डॉन ३ (Don ३) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार असून याबद्दलची माहिती ही एक्सेल एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाऊसचे सहभागीदार रितेश सिधवानी यांनी दिली आहे. याबद्दल सांगताना रितेश म्हणले,” जोपर्यंत माझा मित्र फरहान अख्तर डॉन ३ या सिनेमाचे स्क्रिप्ट पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही काहीही करणार नाही. सध्या फरहान हा स्क्रिप्ट पूर्ण करत आहे. त्यात तो बिझी असून लवकरच याबाबत तुम्हला माहिती दिली जाईल. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर हे दोघेही चांगले मित्र असून या दोघांचे एक्सेल एंटरटेनमेंट नावाचे प्रोडक्शन हाऊस आहे. अमिताभ बच्चन यांच्या १९७८ साली प्रदर्शित झालेल्या डॉन या चित्रपटाचे राईट्स या दोन्ही निर्मात्यांनी विकत घेतले आणि २००६ साली पहिला रिमेक बनवला. डॉन च्या या पहिल्या रिमेक मध्ये प्रमुख भूमिकेत शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा आपल्याला दिसले. ह्या चित्रपटाला भरून यश मिळाले. त्यानंतर २०११ साली डॉन २ प्रदर्शित झाला असून याचे दिग्दर्शन हे फरहान अख्तर यांनी केले.

मात्र शाहरुखने दोन ३ या चित्रपटाला नकार दिला आहे अश्या चर्चा सध्या सुरु आहेत. मात्र हे अजून स्पष्ट झालेले नाही. तर शाहरुख खान सोबत रणवीर सिंग देखील डॉन ३ या चित्रपटात भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर अमिताभ बच्चन देखील या चित्रपटात काम करणार आहेत अश्या चर्चा रंगल्या आहेत. चित्रपमध्ये रणवीर सिंग कडे शाहरुख खान डॉन चे टायटल देणार असून पुढचे भाग रणवीर सिंग वर बनवता येतील मात्र याबाबत अजूनही अधिकृत अशी घोषणा झालेली नाही. सध्या शाहरुख खान हा त्याच्या नवीन चित्रपटात बिझी आहे. शाहरुख खान चा डंकी हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. डंकी(Dunki) नंतर शाहरुख खानचा जवान चित्रपटही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पठाण (Pathan) नंतर शाहरुख खान चे लागोपाठ चित्रपट येणार असून चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

हे ही वाचा : 

Parineeti-Raghav चा रॉयल साखरपुडा, गाणं गात दिले सरप्राईज

गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंबद्द केले मोठे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss