Tuesday, May 14, 2024

Latest Posts

ईडीने जप्त केली जॅकलीन फर्नांडीसची मालमत्ता

जॅकलीन फर्नांडिसची 7.27 कोटींची संपत्ती ईडीने जप्त कलेली आहे.   

बॉलिवूडमधील सूप्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस तिने आतापर्यंत अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जॅकलीनचा ‘राम सेतू’ नावाचा चित्रपट रिलीज होण्याच्या वाटेवर आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारसोबत जॅकलीन दिसणार आहे. मात्र, असं असलं तरी जॅकलीन सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सतत राजकारणातील व्यक्तींची झोप उडवणारी ईडी आता जॅकलीनची पिडा ठरली आहे. ईडीने आता जॅकलीनची संपत्ती जप्त केली आहे. जॅकलीन फर्नांडिसची 7.27 कोटींची संपत्ती ईडीने जप्त कलेली आहे.
सध्या याच प्रकरणात तुरुंगात असलेला तिचा मित्र आणि त्याच्याशी असलेले संबंध या कारणास्तव जॅकलीन सध्या अडचणीत आली आहे. सुकेश चंद्रशेखर  याच्याशी संबंधित मनी लाँडरिंगच्या प्रकरणात जॅकलीनची ही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. इतकंच नाही तर ईडीने जॅकलीनचे फिक्स्ड डिपॉझिट जप्त केलं आहे. या साऱ्या प्रकारामुळे जॅकलीनच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.  बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर  ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने जॅकलिनची 7 कोटी 27 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. असे म्हणण्यात येते की सुकेश चंद्रशेखर याने आतापर्यंत जॅकलिन ला अनेक महागडे गिफ्ट्स दिले आहेत. 9 लाख रुपये किमतीचा घोडा, 52 लाख किमतीची पर्शियन कार, बिर्किनी बॅग, चॅनेल, गुची, YSLचे कपडे, हर्मीस-टीफिनी ब्रेसलेट, महागड्या अंगठ्या आणि कानातले, रोलेक्स, फ्रँक मूलरची घड्याळं, कुटुंबातील सदस्यांना पोर्श आणि मासेराती कार भेट, अमेरिकेतील बहिणीला 1 लाख 80 हजार डॉलरची मदत, ऑस्ट्रेलियातील भावाला 50 हजार डॉलर, जॅकलीनला चार महागड्या मांजरी अशा असंख्य भेटवस्तू त्याने जॅकलिन ला दिल्या आहेत.
हे गिफ्ट्स पाहून अनेकांनी जॅकलीन ला प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. तर आता ईडी चा निर्णय काय असेल यावर सगळ्यांचं लक्ष आहे.

Latest Posts

Don't Miss