Adipurush चित्रपटातील Jai Shri Ram गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस

सध्या सगळीकडे आदिपुरुष (Adipurush) या सिनेमाची चर्चा रंगली आहे. नुकताच ओम राऊत दिग्दर्शित या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. प्रेक्षकांना या ट्रेलरने अगदी वेड लावले होते.

Adipurush चित्रपटातील Jai Shri Ram गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस

सध्या सगळीकडे आदिपुरुष (Adipurush) या सिनेमाची चर्चा रंगली आहे. नुकताच ओम राऊत दिग्दर्शित या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. प्रेक्षकांना या ट्रेलरने अगदी वेड लावले होते. ट्रेलर मध्ये बॅकग्राऊंड मध्ये वाजत असलेल्या ‘जय श्री राम’ या गाण्याची प्रत्येकालाच उत्सुकता होती. प्रत्येक जण या गाण्याची आतुरतेने वाट पाहत होता. आणि शेवटी आज प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली आहे. आदिपुरुष (Adipurush) या सिनेमातील ‘जय श्री राम’ (Jai Shri Ram Song) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याला नेटकऱ्यांची भरभरून पसंती मिळत आहे.

जय श्री राम’ (Jai Shri Ram Song) या गाण्यात श्रीरामभक्तीचा गजर होताना पाहायला मिळत आहे. या गाण्याचे संगीत दिग्दर्शन प्रसिद्ध मराठी संगीतकार अजय-अतुल यांनी केलं असून मनोज मुंतशिर शुक्ला हे या गाण्याचे गीतकार आहेत.सगळीकडूनच जय श्री राम’ (Jai Shri Ram Song) या गाण्याच्या गीतकारांचे व संगीतकाराचे कौतुक होत आहे. तसेच जय श्री राम’ (Jai Shri Ram Song) हे गाणं टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आलं असून नेटकऱ्यांनी भरभरून लाईक्स चा वर्षाव केला आहे.

थोड्याच दिवसांपूर्वी आदिपुरुष सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला होता. या सोहळ्या दरम्यान अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti Sanon) ने अभिनेता प्रभास (Prabhas) चे गॉड शब्दात कौतुक केले. क्रिती सेनॉन (Kriti Sanon) व प्रभास (Prabhas) हे दोघे ही आदिपुरुष (Adipurush) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. क्रिती सेनॉन (Kriti Sanon) आणि प्रभास (Prabhas) सीता आणि राम यांचे पात्र साकारत आहेत.

हे ही वाचा : 

Time maharashtra exclusive : निधी खेचून आणणे हे त्या प्रतिनिधींच्या स्किल्सवर अवलंबलेले, बघूया नेमकं काय म्हणाले Milind Patankar

‘Don 3’ मध्ये शाहरुख ऐवजी दिसणार ‘हा’ अभिनेता, लवकरच होणार अधिकृत घोषणा…

सीबीआयच्या पाच तासाच्या चौकशी नंतर, वानखेडे होणार का निलंबित?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version