Me Honar Super Star Jallosh Juniors चे विजेते शरयू आणि सई, पुन्हा एकदा Vaibhav Ghuge ने मारली बाजी 

नुकताच  'मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्स' चा (Me Honar Super Star Jallosh Juniors Cha) अंतिम सोहळा काल पार पडला. या लोकप्रिय कार्यक्रमाचा काल फायनलचा एपिसोड होता.

Me Honar Super Star Jallosh Juniors चे विजेते शरयू आणि सई, पुन्हा एकदा Vaibhav Ghuge ने मारली बाजी 

नुकताच  ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्स’ चा (Me Honar Super Star Jallosh Juniors Cha) अंतिम सोहळा काल पार पडला. या लोकप्रिय कार्यक्रमाचा काल फायनलचा एपिसोड होता. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्स’ या कार्यक्रमाचा पुण्याची सई आणि शरयू या पर्वाच्या महाविजेत्या ठरल्या आहेत. सई जगताप (Sai Jagtap) आणि शरयू सोळंकी (Sharyu Solanki) या दोघांना चाहते आता सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. या कार्यक्रमामध्ये अंतिम लढतीत सागर आणि दिव्येश, झीरो डिग्री क्रू ग्रुप, डी टू डी क्वीन्स ग्रुप, श्रीमयी सूर्यवंशी, सई आणि शरयू यांच्यामध्ये लढत रंगली होती.

‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्स’ चा विजेता शरयू आणि सई या दोघांनी बाजी मारली आहे. त्यांनतर या कार्यक्रमामध्ये जळगावचे सागर आणि दिव्येश हे दोघे उपविजेते झाले आहेत. झीरो डिग्री क्रू ग्रुप आणि कराडच्या डी टू डी क्वीन्स ग्रुप या दोन्ही ग्रुपला तिसरा क्रमांक विभागून मिळाला आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या सोहळ्याच्या दरम्यान श्रीमयी सूर्यवंशीला उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गौरवण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या विजेत्याला सई आणि शरयू यांना पाच लाखांची रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्यादरम्यान श्रीमयी सूर्यवंशीला उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गौरवण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान खास पाहुणे म्हणून सई आणि शरयूला ‘शुभविवाह’ मालिकेतील भूमीनेही साथ दिली होती. जेव्हा कार्यक्रमाचा विजेता घोषित केला आणि त्यांनतर आनंद व्यक्त करण्यात आला तेव्हा साई आणि शरयू म्हणाल्या की, हा सारा प्रवास स्वप्नवत आहे. महाअंतिम सोहळ्यात सामील होण्यासाठी आम्ही बरीच मेहनत घेतली होती. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे खूप आनंद होत आहे. या मंचाने अंकुश चौधरी, फुलवा खामकर आणि वैभव घुगे गुरुच्या रुपात दिले. या गुरुंकडून खूप काही शिकायला मिळालं

हे ही वाचा:

Odisha Train Accident मध्ये बचावलेल्या नागरिकांसाठी Reliance Foundation चा हातभार

Rahul Gandhi म्हणाले, एकीकडे Mahatma Gandhi, तर दुसरीकडे Nathuram Godse…

Watch Video, Odisha Train Accident नंतर तब्ब्ल ५१ तासानंतर पहिली ट्रेन धावली, अन् रेल्वेमंत्र्यांनी जोडले हात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version