Sunday, May 12, 2024

Latest Posts

बिनधास्त अंदाजातला सुष्मिता सेनचा ‘आर्या ३’ सिरीजचा जबरदस्त टीझर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची आगामी 'आर्या 3' ही वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारं आहे.आता पुन्हा एकदा ओटीटीवर आपल्या अभिनयाची शैली दाखवण्यासाठी ती सज्ज झाली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची आगामी ‘आर्या 3’ ही वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारं आहे.आता पुन्हा एकदा ओटीटीवर आपल्या अभिनयाची शैली दाखवण्यासाठी ती सज्ज झाली आहे. तर आर्या ३ या सिरीजचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर सुष्मिता प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. सुष्मिताच्या ‘आर्या’ आणि ‘आर्या 2’ या वेबसीरिजने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.या दोन्ही सिरीजच्या भागांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.तर प्रेक्षक आता ‘आर्या 3’ या सिरीजची वाट पाहत आहेत.

आर्या 3′ या सीरिजचा दमदार टीझर आऊट झाला आहे. या टीझरमध्ये सुष्मिता सेन तलवार घेऊन लढताना दिसत आहे.तसचं ती बंदुक चालवताना देखील दिसून येतं आहे. तसेच 20 सेकंदाच्या या टीझरमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या भागाची झलक पाहायला मिळत आहे.या सिरीजमध्ये सुष्मिताचा डॅशिंग आणि बिनधास्त अंदाज देखील पाहायला मिळत आहे.

‘आर्या 3’ ही सीरिज 9 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हॉटस्टारवर ही सीरिज प्रेक्षकांना पाहता येईल. 2020 मध्ये आलेल्या ‘आर्या’ या सिनेमाच्या माध्यमातून सुष्मिताने अभिनयक्षेत्रात कमबॅक केलं होतं. तर या सीरिजच्या माध्यमातून सुष्मिताने ओटीटी विश्वात पदार्पण केलं होतं. या सीरिजमधील सुष्मिताच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी जगासोबत भांडताना ती दिसून आली होती.’आर्या 3’च्या टीझरमध्ये आपल्याला दमदार असे डायलॉगही आहेत.ते सुष्मिता सेन बोलताना दिसून येतं.

या सीरिजबद्दल बोलताना सुष्मिता म्हणाली,”आर्याचं माझ्या हृदयात एक वेगळं स्थान आहे. या सीरिजचा प्रत्येक भाग हा कमाल आहे. आता या सीरिजमध्ये एक वेगळी आर्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या भूमिकेने मला खूप काही दिलं आहे”. राम माधवानी आणि संदीप मोदी यांनी या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे, आणि निर्मिती देखील केली आहे. सुष्मितासह या सीरिजमध्ये इला अरुण, सिकंदर खेर, इंद्रनील सेनगुप्ता, विकास कुमार, गीतांजली कुलकर्णी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.दरम्यान आता वेबसिरीज प्रेमीं या सिरीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हे ही वाचा:

मकर संक्रांतीला घरी बनवून पाहा तीळ गुळाची पोळी

पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचे CM EKNATH SHINDE यांच्या हस्ते उद्धाटन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss