Ashok Saraf यांच्या वर चक्क आली होती चेहरा लपवण्याची वेळ…

अशोक सराफ हे चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. अशोक सराफ यांना चित्रपटसृष्टीत सर्वजण मामा या नावाने ओळखतात. मामांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेकांच्या मनात उच्च स्थान निर्माण केले.

Ashok Saraf यांच्या वर चक्क आली होती चेहरा लपवण्याची वेळ…

अशोक सराफ हे चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. अशोक सराफ यांना चित्रपटसृष्टीत सर्वजण मामा या नावाने ओळखतात. मामांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेकांच्या मनात उच्च स्थान निर्माण केले. मामांचे अनेक सिनेमे हे त्याकाळात सुपरहिट झाले. विनोदाचा उत्तम टाईमिंग असणाऱ्या या अभिनेत्याने सर्वांनाच खळ-खळून हसवले. तसेच चित्रपट सृष्टीत आपल्या मोलाच्या योगदानाने महत्वाचे स्थान निर्माण केले. परंतु सर्वांच्या मनावर राज करणाऱ्या या अभिनेत्यावर एकदा तोंड लपवायची वेळ आली होती.

अशोक सराफ यांची एक झलक दिसावी यासाठी अनेक चाहते धडपड करतात. परंतु, एकदा सराफ यांच्या सोबत अशी घटना घडली होती ज्यामुळे त्यांना चक्क चेहरा लपवून प्रवास करावा लागला. एका मुलाखतीत मामांनी या किस्स्या बद्दल सविस्तर सांगितले. आजवरच्या कारकिर्दीत अशोक सराफ यांनी अनेक चित्रपट गाजवले. त्यातलाच एक सिनेमा म्हणजे पांडू हवालदार. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. एकीकडे हा सिनेमा गाजत असताना दुसरीकडे अशोक सराफ यांना मात्र चक्क तोंड लपवून प्रवास करावा लागत होता.

अशोक सराफ यांनी जुना काळ प्रचंड प्रमाणात गाजवला. मामांचे चित्रपट जरी त्या काळी गाजत असले तरी त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे ते एका सिनेमाच्या शूटिंगसाठी रेल्वे प्रवास करत कोल्हापूरला निघाले होते. यावेळी त्यांनी महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या सेकंड क्लास डब्याचं तिकीट काढलं होतं.या प्रवासादरम्यान दोन पोलिसांनी त्यांना बरोबर ओळखलं आणि त्यांची खिल्ली उडवली. तुम्ही मोठे कलाकार असूनही सेकंड क्लासने प्रवास करताय, असं म्हणत त्यांची मस्करी केली होती. त्यामुळे पुढील प्रवासात अन्य लोक पाहू नयेत आणि शरमेने मान खाली घालायला लागू नये यासाठी अशोक मामांनी संपूर्ण प्रवासात त्यांचा चेहरा पांघरुणाखाली झाकून ठेवला. दरम्यान, अशोक सराफ यांनी त्यांच्या बहुरुपी या पुस्तकातही या प्रसंगाचं वर्णन केलं आहे.

हे ही वाचा:

‘jara hatke zara bachke’ ने पहिल्याच दिवशी केली कोटींची कमाई!

साराने केला शर्मिला टागोर सोबत अभिनय, व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल

Bigg Boss OTT’ S2 मध्ये होणार ‘या’ गायकाची Entry?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version