Friday, May 3, 2024

Latest Posts

सिनेमागृह गाजवलेले चित्रपट पाहा आता OTT वर

आजकाल सिनेमागृहात जाऊन मुव्ही बगणाऱ्यांपेक्षा ओटीटी वर मुव्ही बगणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. बाहेर पडण्यापेक्षा घरात बसून चित्रपट पाहून लोकांना जास्त आवडत. मागील काही महिन्यात सिनेमागृह गाजवलेले चित्रपट आता ओटीटी वरती देखील उपलब्ध आहेत.

आजकाल सिनेमागृहात जाऊन सिनेमा बघणाऱ्यांपेक्षा ओटीटीवर सिनेमा बघणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. बाहेर पडण्यापेक्षा घरात बसून चित्रपट पाहून लोकांना जास्त आवडतं. मागील काही महिन्यात सिनेमागृह गाजवलेले चित्रपट आता ओटीटी (OTT) वरती देखील उपलब्ध आहेत. बॉक्स ऑफिसवर गाजलेले काही चित्रपट तुम्हाला आता ओटीटी (OTT) वर पाहायला मिळतील. आता हे कुठले चित्रपट आहेत जाणून घेऊया.

गंगुबाई काठियावाडी (Gangubai Kathiyawadi) –

गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट २२ फेब्रुवारी २०२२ रोजी सिनेमागृहात रिलीज झाला होता. आलिया भट्ट प्रमुख पात्र निभावलेला हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटातील डायलॉग्स प्रेक्षकांना चांगलेच आवडले होते. आता नेटफ्लिक्सवर हा चित्रपट सर्वांना पाहता येईल.

केजीएफ (KGF) –

२०१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर चांगलाच राज्य केलं. सुपरस्टार यशच्या करिअर मधला हा धमाकेदार चित्रपट मानला जातो. डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांना आता हा चित्रपट पाहता येईल.

ब्रम्हास्त्र (Bramhastra) –

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या प्रसिद्ध जोडीचा ब्रम्हास्त्र हा चित्रपट २०२२ मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट तुम्ही डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.

आरआरआर (RRR) –

ज्युनियर एनटीआर आणि रामचरणचा गाजलेल्या या चित्रपटाने ऑस्कर देखील पटकावला आहे, म्हणून हा चित्रपट प्रत्येकाने पाहायलाच हवा. हा चित्रपट प्रत्येकाला नेटफ्लिक्स वर पाहायला मिळेल.

जवान (Jawan) –

शाहरुख खान आणि दीपिकाचा मागच्या वर्षी रिलीज झालेला चित्रपट म्हणजे जवान. ज्याने बॉक्स ऑफिस वर ११०० कोटींची कामे केली होती हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स वर पाहू शकाल.

डार्लिंग्स (Darlings) –

२०२२ साली रिलीज झालेला आलीय भट्टचा डार्लिंग्स हा चित्रपट एक डार्क कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट पती पत्नी आणि त्यांच्या नात्याबद्दल आहे. हा तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

पठाण (Pathan) –

मागच्याच वर्षी रिलीज झालेला शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट चांगलाच हिट ठरला. त्याने बॉक्स ऑफिसवरदेखील चांगलीच कामे केली. प्राईम व्हिडीओवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.

रॉकी और राणी की प्रेम कथा (Rockey Aur Rani Ki Prem Katha) –

मागच्याच वर्षी रिलीज झालेला रॉकी और राणी की प्रेम कथा या चित्रपटामध्ये पुन्हा एकदा रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पाहायला मिळाले. दोन भिन्न कुटुंबातील दोघे जण कसे एकमेकांच्या प्रेमात पडतात, यावर चित्रपट आधारलेला आहे. प्राईम व्हिडीओवर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.

हे ही वाचा:

मतदार यादीत नाव आहे की नाही? तपासणार कसे?

Chhatrapati Sambhajinagar मधून लढणार Sandipan Bhumare, CM Eknath Shinde यांची अधिकृत घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss