Sunday, May 19, 2024

Latest Posts

Christmas 2022 तुम्ही तुमच्या विगन मित्रमैत्रिणींसाठी भेटवस्तू शोधताय का? तर ‘या’ भेटवस्तू ठरू शकतात उत्तम पर्याय

त्यामुळे आज आपण अशाच काही विगन भेटवस्तूंच्या पर्यायांबाबत जाणून घेणार आहोत. जे तुम्हाला तुमच्या विगन मित्रपरिवार आणि कुटुंबासाठी भेटवस्तू शोधण्यास मदत करतील.

विगन म्हणजे काय ?

‘विगन’ ही संकल्पना १९४४ साली अस्तित्वात आली. डोनाल्ड वॉटसन यांनी १९४४ साली युकेमध्ये ‘विगन सोसायटीची’ स्थापना केली. वॉटसन स्वतः शाकाहारी होते. मात्र, डेअरी उद्योगामध्ये प्राण्यांचा होणारा छळ असह्य झाल्याने त्यांनी एक नवी संकल्पना जन्माला घातली आणि ही संकल्पना म्हणजे डेअरी उत्पादनांचा वापर न करणारे शाकाहारी म्हणजेच विगन.

अलीकडच्या काळात जगभरात विगन आहार घेणाऱ्या लोकांचे प्रमाण विलक्षणरित्या वाढत चालले आहे. लोक प्राण्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या जीवनशैलीत बदल करत आहेत. जगातील इतर भागांप्रमाणे भारतातही अनेक लोक विगन आहराचा स्वीकार करत आहेत. अनुष्का शर्मा, विराट कोहली सारख्या मोठमोठ्या सेलिब्रिटीजपासून अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत अनेक लोक विगन लाइफस्टल आता फॉलो करू लागली आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींना काहीतरी भेटवस्तू देताना खूप विचार करून भेटवस्तू निवडावी लागते. त्यामुळे आज आपण अशाच काही विगन भेटवस्तूंच्या पर्यायांबाबत जाणून घेणार आहोत. जे तुम्हाला तुमच्या विगन मित्रपरिवार आणि कुटुंबासाठी भेटवस्तू शोधण्यास मदत करतील.

मिल्क मेकर:

विगन आहार घेणारे लोक सहसा त्यांच्या रोजच्या आहारात गाय, म्हैस किंवा मग बकरीपासून मिळणाऱ्या दुधाचा समावेश करत नाहीत. ते त्यांच्यासाठी विगन दुधाचे पर्याय निवडतात. जे पूर्णतः बदाम, काजू, भुईमूग, अशा सुक्या मेव्यापासून किंवा मग ओट्सपासून बनवलेले असते. पण, हे वनस्पती आधारित दूध खूप कमी प्रमाणात आणि खूप कमी ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे महाग असते. अशात तुमच्या मित्रमैत्रिणीसाठी विगन मिल्क मेकर एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

सुवासिक मेणबत्त्या:

मेणबत्त्या हा क्रिसमस या सणाचा एक अविभाज्य भाग आहे. अनेकदा क्रिसमससाठी विकत घेतलेल्या मेणबत्त्यांमध्ये बीसवक्सचा समावेश असतो. त्यामुळे अशा वेळेस विगन सुवासिक मेणबत्त्या ज्यात लवेंडर, लिंबू यांसारख्या नैसर्गिक तेलाचा समवेश असतो. एक चांगली भेटवस्तू ठरू शकते.

नारळाच्या कवचाचे बाऊल आणि चमचे:

विगन लोकांच्या मनात लाकडाच्या किंवा नारळाच्या कवचापासून बनवलेल्या भांड्याबद्दल एक वेगळीच जागा असते. त्यामुळे त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात वापरण्यासाठी असाच एखादा भांड्यांचा सेट देणं योग्य ठरेल.

कॅसुअल बूट:

विगन माणसं चामड्यापासून किंवा प्राण्यांच्या त्वचेपासून बनवलेल्या चपला किंवा बूट वापरणं सहसा टाळतात. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी झाडाच्या तंतूंपासून आणि पुनर्वापर करता येईल अशा मटेरियलपासून बनवलेले बूट हे सुध्दा एक उत्तम गिफ्ट ठरू शकते.

हे ही वाचा:

Christmas 2022 हिंदी-इंग्रजीत नव्हे तर ऐका ‘जिंगल बेल्सचं’ व्हायरल भोजपुरी व्हर्जन ‘सांता आवेला’

Christmas 2022 रेनडिअर शिवाय या ‘४’ प्राण्यांना ख्रिसमसच्या दिवशी दिले जाते खास महत्त्व, जाणून घ्या का दिले जाते हे महत्त्व?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss