Sunday, May 19, 2024

Latest Posts

Christmas 2022 : Happy Christmas नव्हे Merry Christmas, जाणून घ्या आगळीवेगळी कथा

डिसेंबर (December) महिना आला की जगभरात 'मेरी ख्रिसमस'चे (Merry Christmas) बोल कानावर पडू लागतात. 'मेरी ख्रिसमस' म्हणत लोक एकमेकांना नातळ सणाच्या शुभेच्छा देतात. तसे भेटकार्डही वाटले जातात.

Christmas 2022 : डिसेंबर (December) महिना आला की जगभरात ‘मेरी ख्रिसमस’चे (Merry Christmas) बोल कानावर पडू लागतात. ‘मेरी ख्रिसमस’ म्हणत लोक एकमेकांना नातळ सणाच्या शुभेच्छा देतात. तसे भेटकार्डही वाटले जातात. तुम्हाला देखील तुमच्या मित्र-मैत्रिणींनी ‘मेरी ख्रिसमस’ (Merry Christmas) असे मेसेज पाठवून शुभेच्छा दिल्या असतील, उत्तरादाखल तुम्हीदेखील ‘मेरी ख्रिसमस’ असा मेसेज पाठवला असेल. परंतु, तुम्ही कधी असा विचार केला आहे का की, जेव्हा आपण कुठल्याही सणाच्या शुभेच्छा देतो तेव्हा ‘Happy’ हा शब्द वापरतो. म्हणजेच ‘हॅपी न्यू इयर’, ‘हॅपी होली’ किंवा ‘हॅपी दिवाली’ असे म्हणतो. पण नाताळच्या शुभेच्छा देताना, ‘हॅपी ख्रिसमस’ न लिहिता, केवळ ‘मेरी ख्रिसमस’च का पाठवले जाते? आज या मागचं कारण जाणून घ्या…

मेरी आणि हॅपीमध्ये फरक काय?

युरोपात १८ व्या आणि १९ व्या शतकात नाताळच्या शुभेच्छा ‘हॅपी ख्रिसमस’ बोलून दिल्या जायच्या. इंग्लंडमध्ये तर आजही अनेक लोक नाताळच्या शुभेच्छा ‘हॅपी ख्रिसमस’ बोलूनच दिल्या जातात. याशिवाय याशिवाय ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनीही ‘हॅप्पी ख्रिसमस’ हा शब्द वापरला होता. ‘हॅपी’ आणि ‘मेरी’ या दोन्ही शब्दांचा अर्थ आनंद असा सारखाच आहे. मात्र, सध्या ‘मेरी’ हा शब्द अधिक प्रचलित आहे. तसेच बरेच तज्ज्ञ म्हणतात की, ‘मेरी’ या शब्दामध्ये थोड्याशा भावना देखील जोडल्या गेल्या आहेत. या शब्दांत आनंदाची अभिव्यक्ती देखील आहे. तर, हॅपी हा शब्द केवळ शुभेच्छा देण्यासाठी वापरला जातो. अशा वेळी लोक नाताळ सणाच्या शुभेच्छा देताना त्याला अधिक भावनात्मक करण्यासाठी ‘मेरी’ हा शब्द वापरला जातो. तसे, मेरी शब्द हा शब्दकोषात बर्‍याच वर्षांपासून आहे आणि याचा उल्लेख १६ व्या शतकापासून केला जात आहे.

मग हॅपी ख्रिसमस चुकीचे?

‘हॅपी ख्रिसमस’ असे म्हणणे देखील चुकीचे नाही. अगदी इंग्लंडचा राजा ‘किंग जॉर्ज पाचवा’ देखील ‘हॅपी’ या शब्दाचा वापर करत असे. ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांनाही ‘मेरी’ या शब्दापेक्षा ‘हॅपी’ हा शब्द जास्त आवडत होता. असं म्हटलं जात होतं की, तिला ‘मेरी’ या शब्दावर काहीसा आक्षेप होता. त्याच वेळी, ब्रिटनमधील बर्‍याच उच्च-श्रेणीतील लोकांनी देखील ‘हॅपी’ या शब्दाचा वापर केला. परंतु, ‘मेरी ख्रिसमस’ या ट्रेंडमध्ये कायम आहे. बरेच लोक केवळ ‘मेरी ख्रिसमस’ म्हणतच शुभेच्छा देतात.

‘मेरी ख्रिसमस’ अशाच शुभेच्छा का?

प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक चार्ल्स डिकन्स यांनीही या शब्दाच्या प्रसारात मोलाचे योगदान दिले आहे. सुमारे १७५ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या ‘अ ख्रिसमस कॅरोल’ या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी या शब्दाची ओळख करुन दिली. या पुस्तकात त्यांनी ‘मेरी ख्रिसमस’ आणि ‘हॅपी न्यू इयर’ या शब्दांचा उल्लेख केला होता. यानंतर, मेरी हा शब्द खूप प्रसिद्ध झाला आणि ख्रिसमससह जोडला गेला. जर, तुम्ही एखाद्याला ‘हॅपी ख्रिसमस’ म्हणत शुभेच्छा देत असाल आणि तुम्हाला उत्तरादाखल पुन्हा ‘हॅपी ख्रिसमस’ म्हटले जात असेल, तर त्यात काही वावगे नाही.

प्रसिद्ध साहित्यिक चार्ल्स डिकन्स यांनी ‘मेरी’ शब्द प्रचलित केला

‘मेरी’ हा शब्द प्रसिद्ध होण्यामागे साहित्यिक चार्ल्स डिकन्स यांची मोठी भूमिका मानली जाते. आजपासून सुमारे १७५ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या ‘अ ख्रिसमस कॅरोल’ या पुस्तकात ‘मेरी’ हा शब्द सर्वाधिक वापरण्यात आला होता. यानंतर हे पुस्तक जगभर वाचले गेले आणि त्यानंतर ‘हॅप्पी’च्या जागी ‘मेरी’ शब्दाची प्रथा सुरू झाली. मात्र, तुम्‍ही ‘मेरी ख्रिसमस’ ऐवजी ‘हॅपी ख्रिसमस’ म्हणत जरी नाताळच्या शुभेच्छा दिल्या, तर त्यात काहीही गैर नाही.

 

हे ही वाचा:

Christmas 2022 ही ५ अल्कोहोलविरहित मॉकटेल पेये वाढवतील तुमच्या ख्रिसमस पार्टीची शान

Christmas 2022 तुम्ही तुमच्या विगन मित्रमैत्रिणींसाठी भेटवस्तू शोधताय का? तर ‘या’ भेटवस्तू ठरू शकतात उत्तम पर्याय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss