घरात अचानक पाहुणे आले? बनवा ‘हा’ खास सरबत

टरबूज हे प्रत्येकालाच आवडणारे फळ आहे. टरबूजमध्ये लोह (Iron), फायबर (Fiber) आणि व्हिटॅमिन सी (Vitamin C) हे गुणसत्व भरपूर प्रमाणात असतात. यामुळे टरबूज खाल्याने आपली पचनसंस्था चांगली राहते.

घरात अचानक पाहुणे आले? बनवा ‘हा’ खास सरबत

टरबूज हे प्रत्येकालाच आवडणारे फळ आहे. टरबूजमध्ये लोह (Iron), फायबर (Fiber) आणि व्हिटॅमिन सी (Vitamin C) हे गुणसत्व भरपूर प्रमाणात असतात. यामुळे टरबूज खाल्याने आपली पचनसंस्था चांगली राहते. तसेच हाडे ही मजबूत राहतात. टरबूजच्या सेवनाने आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते व शरीराचे वजण देखील कमी होण्यास मदत होते. या शिवाय टरबूज पासून तयार झालेला मिल्कशेक दम्याच्या रुग्णांना साठी मोठ्या प्रमाणात गुणकारक आहे. टरबूज मिल्कशेक चवीला अगदी चविष्ट असून बनवायला देखील अगदी सोपा आहे.

टरबूज हे उन्हाळ्यात मिळणारे रसाळ फळ आहे. उन्हाळ्यात टरबुजाचे सेवन केल्याने आपले शरीर थंड व हायड्रेटेड (Hydrated) राहते. अनेक लोक टरबुजाचे सलाड किंवा रस बनवून पिण्यास प्राधान्य देतात. उन्हाळ्याचा हंगाम सुरू आहे. यातच टरबूज खाल्याने आपल्याला ताजेतवाने वाटते. पण आपण कधी टरबूजाचे मिल्कशेक तयार करून प्यायले आहे का? नसेल तर चला आताच जाणून घेऊयात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारे टरबुजाचे मिल्कशेक कसे तयार करावे.

साहित्य –

टरबूजाचे तुकडे १ कप
कंडेन्स्ड मिल्क किंवा उकळून घेतलेले थंड दूध २ कप
व्हॅनिला अर्क १/२ (हवे असल्यास)
आवडते आईस्क्रीम
बर्फाचे तुकडे
साखर

कृती –

टरबूज मिल्क शेक तयार करण्यासाठी सर्व प्रथम टरबूज घेऊन त्याचे तुकडे करून बाजूला ठेवावे. यानंतर कंडेन्स्ड मिल्क किंवा उकळवलेले दूध आणि टरबूजचे तुकडे थंड करण्यासाठी ठेवावे. नंतर मिक्सर जारमध्ये थंड टरबूजाचे तुकडे, कंडेन्स्ड मिल्क, पाणी आणि व्हॅनिला अर्क (ऑप्शनल) घालावे. यानंतर या सर्व गोष्टी व्यवस्थित बारीक करून शेक तयार करून घ्यावे. अशा प्रकारे आपला स्वादिष्ट आणि थंड-थंड टरबूज मिल्क शेक तयार आहे. नंतर सर्व्हिंग ग्लासमध्ये ठेवून आईस्क्रीमने सजवून थंड टरबूज मिल्कशेक सर्व्ह करावा.

हे ही वाचा:

कंगनाने घेतली शॉर्ट घालून मंदिरात गेलेल्या मुलीची शाळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संसद भवनाच्या नवीन बिल्डिंगचे उदघाटन आणि त्याचवेळेस करणार …

राष्ट्रवादीला मोठा धक्का!, १५ नगरसेवकांनी केला शिंदे गटात प्रवेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version