Friday, April 26, 2024

Latest Posts

राष्ट्रवादीला मोठा धक्का!, १५ नगरसेवकांनी केला शिंदे गटात प्रवेश

सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक मोठं मोठ्या घडामोडी या घडत आहेत. एकीकडे महापालिका निवडणुका, विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका अक्षरशः तोंडावर आल्या आहेत.

सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक मोठं मोठ्या घडामोडी या घडत आहेत. एकीकडे महापालिका निवडणुका, विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका अक्षरशः तोंडावर आल्या आहेत. आणि दुसरीकडे राजकारणात मात्र उलथापालथ ही सुरूच आहे. राजकरणातून आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ही समोर येत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एक मोठा धक्का हा बसला आहे. गोंदियातील नगराध्यक्षासह तब्बल १५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीमधून काढता पाय घेतला आहे.

राष्ट्रवादीच्या गोंदियातील नगराध्यक्षासह तब्बल १५ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या सर्वांच्या अंगावर भगवा शेला टाकत त्यांना शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता या गोष्टीमुळे गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाची ताकद कमी झाली आहे आणि शिंदे गटाला यांचा चांगलाच फायदा झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी राष्ट्रवादीचे गोंदिया जिल्ह्यतील २ नगराध्यक्ष, १५ नगरसेवक आणि राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच यावेळी अनेक महिला कार्यकर्त्याची उपथित होत्या. या सर्व घडामोडीमुळे आता राष्ट्रवादीला मोठा धक्का हा बसला आहे. तसेच पक्षप्रवेशावेळी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दीघे यांच्या नावाने जयघोष केला.

तसेच या दरम्यान ठाकरे गटाचे नेते, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी त्याच सॊबत कार्यकर्ते हे अजूनही आमच्या संपर्कात आहेत असा मोठं दावा शिंदे गटाने केला आहे . तसेच जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसे हे पक्षप्रवेश वाढतील असंही सांगितलं जात आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसणार असल्याचं चित्रं आहे.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss