Wednesday, June 7, 2023

Latest Posts

कंगनाने घेतली शॉर्ट घालून मंदिरात गेलेल्या मुलीची शाळा

बॉलीवूडची अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच कोणत्या तरी विषयासाठी चर्चेत असते. कंगना नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि ती तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमामधून तिचे मत मांडत असते.

बॉलीवूडची अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच कोणत्या तरी विषयासाठी चर्चेत असते. कंगना नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि ती तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमामधून तिचे मत मांडत असते. काही वेळा तिचे विचार नेटकऱ्यांना पटले नाही तेव्हा ती बऱ्याच वेळा ट्रोल देखील झाली आहे. आता कंगनाने एका अनोळखी मुलीची शाळा घेतली आहे. ती मुलगी मंदिरामध्ये शॉट्स घालून गेली होती. त्याचबरोबर कंगनाने तिचा स्वतःचा किस्सा देखील शेयर केला आहे.

ट्विटरवर एका मुलीचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ती मुलगी हिमाचलमधील बैजनाथ शिव मंदिरात जातानाचा हा फोटो आहे. ती मुलगी मंदिरामध्ये शॉर्ट घालून जात आहे. त्या ट्विटमध्ये युजर्सने लिहिले आहे की, “हिमाचलमधील बैजनाथ येथील प्रसिद्ध शिवमंदिराचे हे दृश्य आहे. लोक पब किंवा नाईट क्लबमध्ये जाऊन बैजनाथ मंदिरात पोहोचतात. अशा लोकांना मंदिरात प्रवेश देऊ नये. याला माझा तीव्र विरोध आहे.हे सर्व बघून माझ्या विचारसरणीला लहान किंवा गरीब म्हटले तर तेही मान्य! “

त्यांनतर त्या ट्विटला रिप्लाय करत कंगनाने लिहिले आहे की, “हे पाश्चात्य कपडे आहेत, ज्याचा शोध गोर्‍या लोकांनी लावला आहे आणि त्याचा प्रचार केला आहे, मी एकदा व्हॅटिकनमध्ये शॉर्ट्स आणि टी-शर्ट घालून गेलो होतो, मला आवारातही जाण्याची परवानगी नव्हती, मला माझ्या हॉटेलमध्ये परत जावे लागले आणि बदलावे लागले…. रात्रीचे कपडे घालणारे हे विदूषक म्हणजे आळशी आणि लंगडे असल्याशिवाय दुसरे काही नसतात…. मला वाटत नाही की त्यांच्यात दुसरा कोणताही हेतू असेल पण अशा मूर्खांसाठी कठोर नियम असावेत….”

कंगनाने जसे हे ट्विट केले तेव्हापासून त्या मुलीचा हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. आणि त्या मुलीला ट्रोल केले जात आहे.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss