Thursday, May 16, 2024

Latest Posts

जाणून घ्या… ग्रीन टी हे पेय कश्याप्रकारे ठरते फायदेशीर

'अंग गोठवणारी थंडी आणि वाफाळता चहा’ हे एक अजब रसायन आहे. चहा हा अनेकांचा विकपॉंईट असतो.

‘अंग गोठवणारी थंडी आणि वाफाळता चहा’ हे एक अजब रसायन आहे. चहा हा अनेकांचा विकपॉंईट असतो. आजकाल वजन कमी करण्यासाठी ‘मसाला चहा’ ऐवजी ‘ग्रीन टी’ घेण्याला प्राधान्य दिलं जातं. ग्रीन-टी हे एक ‘आरोग्यदायी पेय’ म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे.

आपण सर्व जण जाणतो, ग्रीन टी हे शरीरासाठी खुप उपयुक्त आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रतिरोधक असतात जे कर्करोगाच्या समस्या दूर करू शकते. ग्रीन टी मधील प्रतिरोधके आपल्या पेशीमध्ये मृत होणाच्या समस्येला दूर करतो त्यामुळे पेशी मृत पावण्याचे प्रमाण कमी होते. हृदयावरील हल्ल्याची समस्या पण दूर करण्यास मदत करते. शरीरातील कोलेस्ट्रोल चे प्रमाण कमी करते. रोग प्रतिकारक शक्ती वाढवितो. ग्रीन टी रोज पिण्यामुळे आपले वजनपण कमी होते. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत मिळते. आपले शरीर तंदुरुस्त राहते. यामध्ये जीवनसत्व ‘क’ मुळे सर्दीमध्येही फार लाभ मिळतो. ग्रीन-टी मधील फायटोकेमिकल्स, पॉलिफेनॉल, इन्झायमी आणि अमिनो ऍसिड तुमच्या मनाला निवांत करतात. ग्रीन टी मुळे त्वचा नितळ होते, चयापचयाचे कार्य सुधारते. ग्रीन-टीमुळे केवळ मनच शांत होतं असे नाही, तर संपूर्ण शरीराच्या स्वास्थासाठी ग्रीन टी फायदेशीरच ठरते.

ग्रीन टी हे पेय कश्याप्रकारे फायदेशीर ठरते…

  • रक्तदाब नियंत्रणात आणते :- रक्तदाब हा सामान्यपणे मुत्रपिंडातील angiotensin – converting enzyme (ACE ) मुळे होते. ग्रीन टी मुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो व पर्यायाने तुमचा रक्तदाब देखील नियंत्रित राहतो.
  • दररोज अँटीऑक्सिडंटचा पुरवठा होतो :- ग्रीन-टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. ज्यांचा तुम्हाला प्रचंड फायदा होतो यामुळे तुमच्या ह्रदयाचे आरोग्य सुधारते. रक्तातून ऑक्सिजनचा होणारा पुरवठा वाढल्याने पेशींचे पोषण होते आणि नुकसान आपोआप कमी होते. ग्रीन-टी पिण्याऱ्या लोकांना ह्रदयरोग होण्याचा धोका ३१ टक्क्यांनी कमी असतो असे आढळले आहे.
  • रोग प्रतिकारशक्ती वाढते :- ग्रीन-टीमधील कॅटेचिन व EGCG मध्ये नियामक टी-पेशी वाढविण्याची क्षमता अधिक असते. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते. तुम्ही कमी आजारी पडता.
  • दातांच्या समस्येपासून बचाव होतो :- ग्रीन-टी प्यायल्याने तुमच्या दातांमध्ये जंतूसंसर्ग कमी प्रमाणात होतो. ग्रीन-टी मधील पॉलिफेनॉल दातांचे जंतूपासून संरक्षण करते. ज्यामुळे तुमच्या दातांचे आरोग्य सुधारते.
  • उर्जा आणि सहनशक्ती वाढते :- ग्रीन-टीमधील कॅटेचिनमुळे तुमच्या शरीरातील उर्जा आणि सहनशक्ती वाढू लागते. ज्यांना काम करताना कंटाळा घालविण्यासाठी अथवा फ्रेश वाटण्यासाठी कॉफी घ्यावी असे वाटत असेल त्यांनी कॉफीऐवजी ग्रीन-टी घेण्यास काहीच हरकत नाही.

हे ही वाचा :-

प्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, डॉक्टरांनी केला खुलासा

Latest Posts

Don't Miss