घरच्याघरी बनवा NATURAL आंबा पोळी, खाण्यास चविष्ट आणि भरपूर दिवस टिकणारी…

आंबा हा फळांचा राजा आहे. आंब्यामध्ये मध्ये सुद्धा खूप जाती आहेत मात्र हापूस आंबा हा सर्वात श्रेष्ठ जातीचा आंबा मानला जातो. आंबा खाण्यासाठी उन्हाळा सुरु झाला रे झाला कि, सर्वजण आब्यांची आतुरतेने वाट बघत असतात.

घरच्याघरी बनवा NATURAL आंबा पोळी, खाण्यास चविष्ट आणि भरपूर दिवस टिकणारी…

आंबा हा फळांचा राजा आहे. आंब्यामध्ये मध्ये सुद्धा खूप जाती आहेत मात्र हापूस आंबा हा सर्वात श्रेष्ठ जातीचा आंबा मानला जातो. आंबा खाण्यासाठी उन्हाळा सुरु झाला रे झाला कि, सर्वजण आब्यांची आतुरतेने वाट बघत असतात. आंबा खाण्यासाठी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकजण आतुर असतात. प्रत्येकाची आंबा खाण्याची स्टाईल ही हटके असते. काही जणांची पसंती ही आंबे कापून खाण्यात असते, काही जण हे आंबा कापून किंवा त्याच्या फोडी करून न खाता आंब्याला फक्त धुवून त्यातील देठाच्या इथला चीक काढून तसेच चोखून खातात. तर काही जणांची पसंती त्याचा रस बनवून पिण्यात असते. तर काही खवय्यांची पसंती ही आंब्यांचे विविध नवीन पदार्थ बनवून ते चवीने खाण्यात असते. अश्यातच एक नवीन आणि सोप्पी आंब्याची रेसिपी आपण आज जाणून घेणार आहोत. ही फळांचा राजाची म्हणजेच आंब्याची रेसिपी आपण वर्षभर खाऊ शकतो.

आंबा पोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

आंब्याचे बारीक केलेले काप
३ चमचे साखर
मीठ (चवीनुसार)
लिंबाचा रस (३ ते ४ थेंब )
पाणी अर्धा कप
वेलची पूड (चवीनुसार)

NATURAL आंबा पोळी बनवण्यासाठी पुढील कृती करावी –

सर्वात प्रथम आंब्याचे बारीक काप करून घ्या. नंतर ते मिक्सरला लावून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. आता तयार झालेल्या पेस्ट मध्ये ३ चमचे साखर घालावी. एका कढईत तूप लावावे. त्यानंतर त्यामध्ये तुम्ही तयार केलेली आंब्याची पेस्ट टाकून एकत्र ढवळून त्यात चवीनुसार वेलची पूड घालावी. त्यानंतर एका ताटाला तेल लावून तयार झालेले मिश्रण ताटात ठेवून २ दिवसांसाठी उन्हात सुकवावे. २ दिवस उन्हात सुकवल्यावर मिश्रणाची पोळी तयार होईल, त्यानंतर त्या आंबा पोळीच्या चकत्या किंवा प्लेट्स करून ते बंद डब्यात साठवणीसाठी ठेवू शकतो आणि कोणी पाहुणे, नातेवाईक आल्यास त्यांना आपण सर्व्ह करू शकतो.

हे ही वाचा : 

भरत जाधव पुन्हा भडकले आणि घेतला मोठा निर्णय

आज समीर वानखेडे होणार का निलंबित?

काही दिवसातच पाहा ‘सिटी ऑफ ड्रीम्स ३’, सिरीजचा प्रोमो रिलीज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version